ETV Bharat / state

नियुक्तीचा कालावधी आणि मानधन वाढवा ! गोंदिया जिल्हा परिषदेसमोर स्वयंपाकी महिलांचे धरणे आंदोलन

शालेय स्वयंपाकी महिलांना १० महिन्यांचे मानधन दिले जाते. त्या ऐवजी त्यांना १२ महिन्यांचे मानधन द्या, या मागणीसाठी गोंदिया जिल्हा परिषदेसमोर स्वयंपाकीन महिला संघांच्यावतीने लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.

school cooking women's agitation
गोंदिया जिल्हा परिषदेसमोर स्वयंपाकीन महिलांचे धरणे आंदोलन
author img

By

Published : Feb 14, 2020, 5:41 AM IST

गोंदिया - महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका शाळेतील स्वयंपाकीन महिलांना १० महिन्यांऐवजी १२ महिन्यांचे मानधन देण्यात यावे, या मागणीसाठी स्वयंपाकी महिलांनी सोमवारपासुन लक्षवेधी उपोषणाला सुरवात केली. जिल्हा परिषद कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. येत्या २० तारखेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेसमोर स्वयंपाकीन महिलांचे धरणे आंदोलन

शाळा व्यवस्थापन समिती दोन महिलांना कामावर घेऊन एका स्वयंपाकी महिलेचे मानधन एक हजार रूपये वाटुन देत आहे. २०० ते ३०० विद्यार्थ्यांमागे तीन महिलांना प्रत्येकी एक-एक हजार रूपये घेण्यास बळजबरी करत आहेत. सदर मानधन अत्यल्प असुनही स्वयंपाकीन महिला व पुरूष शाळांमध्ये पोषण आहार शिजवुन देण्याचे काम करत आहे. म्हणुन स्वयंपाकीन महिलांना किमान वेतन लागु करण्यात यावे, अशी तक्रार आणि मागणी यावेळी स्वयंपाकी महिलांनी केली.

हेही वाचा... Exclusive: काश्मीरचाही विकास मुंबईसारखा व्हावा.. मराठी अन् काश्मिरींच्या भाव-भावना एकच

स्वयंपाकीन महिलांना सेवेतुन काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वयंपाकीन महिलांना शाळा व्यवस्थापन समिती इतर महिलांकडुन पैसे वसुल करून त्यांना कामावर घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मानधनातुन अर्धे मानधन दुसऱ्या महिलांना देण्याची हुकूमशाही शाळा व्यवस्थापन समित्या चालवत आहेत. अर्धे मानधन देत नसाल तर उद्यापासुन येऊ नका अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही यावेळी स्वयंपाकी महिलांनी केला. तचेच शाळा व्यवस्थापन समित्यांनी शासनाच्या नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे शासन नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे व स्वयंपाकीन महिलांना नियुक्त करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समित्यांकडुन काढण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.