गोंदिया - कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यातच आता शाळांमध्ये सुध्दा कोरोनाची एन्ट्री झाली असून १८ शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ७ शिक्षकांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पालकांमध्ये सुध्दा भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत ५ ते ९ वी आणि ११ वीचे वर्ग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोनाचे नियम पाळत शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, आता पाच महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे. यातच मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढीला सुरुवात झाली आहे. मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच शाळांमध्ये देखील कोरोनाने एन्ट्री केल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. गोंदिया तालुक्यात ११, सडक-अर्जुनी तालुक्यात २, सालेकसा तालुक्यात २, अर्जुनी मोरगाव तालुक्यात १, तिरोडा तालुक्यात १ आणि गोरेगाव तालुक्यात एका विद्यार्थ्याचा समावेश आहे, अशा एकूण १८ विद्यार्थी कोरोनाची लागण झाली आहे. तसेच गोंदिया तालुक्यात ५, देवरी तालुक्यात १ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाली असून असे एकूण ७ शिक्षक कोरोनाबाधित झाले आहे. सध्या विद्यार्थी आणि शिक्षण विभागातर्फे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यात तपासणी दरम्यान विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले, त्यामुळे खळबळ उडाली असल्याने जिल्हा प्रशासनने येत्या ३१ मार्च पर्यंत ५ वी ते ९ वी आणि ११ वीचे वर्ग बंद करण्याचे आदेश काढले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांत वाढ
गोंदिया जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढत होत आहे. गोंदिया, तिरोडा, आमगाव या तीन तालुक्यात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत. असल्याने कोरोनाबाधितांचा आलेख दिवसेदिंवस उंचावित असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आज १९ मार्च ला ४७ कोरोनाबंधितांची नोंद झाली, तर १२ बांधितांनी कोरोनावर मात केली आहे. आज आढळलेल्या ४७ रुग्णांपैकी गोंदियात २३, तिरोडा १, गोरेगाव ४, आमगाव ४, सालेकसा ४, देवरी ३, सडक अर्जुनी ५, अर्जुनी-मोरेगाव ३ असे जिल्ह्यात आजचे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात १४ हजार ९४२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर या बाकी १४ हजार ३९२ रुंगानी कोरोनावर मात केली आहे, तर जिल्ह्यात आतापर्यंत १८७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला ३६३ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २६६ कोरोनाबाधित रुग्ण हे घरीच अलगीकरणात उपचार घेत आहेत. तर ९७ कोरोनाबाधित रुग्ण हे रुग्णालयात उचार घेत आहेत.