ETV Bharat / state

लाच स्वीकरताना तिरोडा तहसीलदार 'एसीबी'च्या जाळ्यात

70 हजार रूपयांची लाच घेताना या तहसीलदाराला अटक करण्यात आली आहे.

तिरोडा तहसीलदार 'एसीबी'च्या जाळ्यात
author img

By

Published : Jul 30, 2019, 8:23 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याचे तहसीलदार संजय रामटेके आणि माडगी येथील विपील कुंभारे याना भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. 70 हजार रूपयांची लाच घेताना या तहसीलदाराला अटक करण्यात आली आहे.

तिरोडा तहसीलदार 'एसीबी'च्या जाळ्यात

याबाबत अधिक माहिती अशी, की तक्रारदार रेती व्यावसायिकांचे तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जंगलात तहसीलदार संजय रामटेके यांनी ट्रक अडवले. तसेच त्यांनी या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी आणि ट्रक नियमित चालू ठेवण्यासाठी मासिक ३० हजार रुपये याप्रमाणे 70 हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक कार्यलयाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने 70 हजार रोख रक्कम स्वीकारताना तहसीलदाराला अटक केली.

याप्रकरणी दोघांविरुद्ध तुमसर पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro: Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 30-07-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- MH_GON_30.JULY.19_ACB_7204243
तहसीलदार संजय रामटेके ७० हजराची लाच घेताना अटक
Anchor :- गोंदिया जिल्याच्या तिरोडा तालुक्यातील तहसीलदार संजय रामटेके आणि माडगी येथील खाजगी इसम विपील कुंभारे याना भंडारा लाच लुचपत पर्तिबंधक विभागाच्या पथकाने ७० हजाराची लाच घेताना अटक केली आहे .
VO :- तक्रार दार हे रेती व्यवसायिक असून तुमसर तालुक्याच्या चारगाव वाडु घाटावरून वाडु भरून तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जंगलातून ट्रक नेत असताना तहसीलदार संजय रामटेके यांनी फिर्यादीचे ट्रक अडवत कार्यवाही न करण्यासाठी आणि ट्रक नियमित चालू देण्यासाठी तसेच फिर्यादी यांच्या मित्रांचे देखील दोन ट्रक सुरळीत चालू देण्यासाठी मासिकं ३० हजार रुपये असे एकूण ७० हजार रुपये देण्याची मागणी फिरंदीकडे तहसीलदार संजय रामटेके यांनी केली मात्र फिर्यादी यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने फिर्यादीने याची तक्रार भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक कार्यलयात केली असून भंडारा लाचलुचपत विभागाने माडगी येथील खाजगी इसम विपुल कुंभारे याला ७० हजार रोख रक्कम स्वीकारताना केली अटक तर तहसीलदार संजय रामटेके याना तिरोडा तहसील कार्यलयातून अटक केली असून दोघानविरुद्ध तुमसर पोलिश ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अणनवे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीना अटक करण्यात आली आहे
BYTE :- महेश साठे (पोलीस उपाधीक्षक एसीबी, भंडारा)Body:VO :-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.