गोंदिया - चालत्या रेल्वेत चढताना पाय घसरून पडलेल्या 65 वर्षीय वृद्धाचा रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने प्राण वाचवला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून देवजी भाई पटेल (वय 65) असे या वृद्धाचे नाव आहे. ते पूरी-गांधीधाम विनाथांबा गाडीने प्रवास करत होते.
![देवजी भाई पटेल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-gon-28may19-relwaystationsnews-7204243_28052019200837_2805f_1559054317_381.jpg)
त्यावेळी रेल्वे गोंदिया स्थानकावर आल्यावर देवजी पटेल हे पाणी पिण्यासाठी स्थानकावर उतरले. यादरम्यान गाडी निघाली त्यावेळी चालत्या रेल्वेत चढताना देवजी पडल्यामुळे प्लॅटफार्म आणि रेल्वे यामधून फरफटत जाऊ लागले. तेव्हा घटनास्थळी उपस्थित असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाने वेळीच त्यांना ओढुन बाहेर काढले. रेल्वे सुरक्षा जवानाच्या सतर्कतेच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
![रेल्वे सुरक्षा दलाचे जवान](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-gon-28may19-relwaystationsnews-7204243_28052019200837_2805f_1559054317_93.jpg)