गोंदिया - आरक्षित ऑनलाईन रेल्वेच्या तिकिटांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरूध्द रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली. यामध्ये गोंदियातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकला असता, त्या ठिकाणी बेकायदेशीर रेल्वेच्या आरक्षणाची तिकिटे बनवून अधिक पैशांमध्ये विक्री करत असलेल्या दोघांवर कारवाई करत 22 आरक्षित रेल्वे तिकीटांसह साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
हेही वाचा - 'अबकी बार-चोरी छिपे शपथ सरकार,' मनीष सिसोडियांचा भाजपला टोला
गोंदिया रेल्वे सुरक्षा दलाला बेकायदेशीर संकेतांक तयार करुन आरक्षित तिकीट तयार केले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर अधिक पैशांनी विक्री करत असल्याची माहिती मिळाली असता, या आधारे एस. आर. हॉलीडेस राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स पाल चौक, व कनेक्टींग इंडिया टुर अॅन्ड ट्रॅव्हल्स देशबंधू वार्ड कुडवा लाईन, गोंदिया या दोन्ही दुकानात छापा टाकला. दुकानात तपासणी केली असता, दुकानातून बेकायदेशीर रेल्वेच्या 22 आरक्षित तिकटी हस्तगत करण्यात आले असून तिकीट बनविण्यात आलेले कंम्प्युटर सिस्टम व ई-तिकीट बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले.
तसेच दिया दुकानात पथक पोहोचल्यानंतर बेकायदेशीरपणे तयार केलेल्या रेल्वे आरक्षित ई-तिकिटांची चौकशी केली. चौकशीत बेकायदेशीर बनविलेल्या एकुण 3 नग रेल्वेची ई-तिकीट जप्त करण्यात आली. अतिरिक्त पैसे घेऊन तिकिटांची विक्री केल्याचे रेल्वे कायद्याच्या कलम 143 नुसार कारवाई केली.
हेही वाचा - पवार कुटुंबीयांमध्ये फूट; राज्यात पुन्हा काका-पुतणे आमनेसामने