गोंदिया - राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २०१९-२०२० अंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील १ लाख ९ हजार ८२८ बालकांना पोलिओचे लसीकरण करण्यात येत आहे. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य विभागाने तयारी करत आज (रविवार) सकाळपासून जिल्ह्यात पल्स पोलिओची मोहीम सुरू झाली. नक्षल क्षेत्रातील एकही बाळ 'पल्स पोलिओ'च्या लसीकरणापासून वंचित राहणार नाही. हे उद्दिष्ठ ठेवत आरोग्य विभागाच्या चमू रवाना झाल्या असल्याची माहिती गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाच्या वैधकीय अधीक्षक डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी दिली.
गोंदिया जिल्ह्यत १ लाख ९ हजार ८२८ बालकांचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यामध्ये ९० हजार ४१२ ग्रामीण भागातील तर, १९ हजार ४१६ शहरी भागातील बालकं आहेत. याकरता जिल्हाभरात १ हजार ४०६ पोलिओ बुध उभारण्यात आले असून ग्रामीण भागामध्ये १ हजार २७९ पोलिओ बुथ तर, शहरी भागात १२९ पोलिओ बुथ आहेत. या व्यतिरिक्त रेल्वे स्थानक, बस स्थानक, गर्दीच्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी बालकांना पल्स पोलिओची लस देत आहेत.
हेही वाचा - निर्भया पथके झाली बंद, आता गोंदियातील हजारो शाळकरी मुली स्वत:च करणार आत्मसंरक्षण
या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागातील २ हजार ८२८ आणि शहरी भागातील ३१५ अशा एकूण ३ हजार १९५ आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच मोहिमेला यशस्वी करण्यासाठी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पारिचारिका आरोग्य विभागाच्या अन्य कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे.
हेही वाचा - नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात आढळले दुर्मिळ 'अल्बिनो' सांबर