ETV Bharat / state

मोहफुलाच्या साठ्यावर पोलिसांचा छापा, दीड लाखांंची मोहफूलं जप्त - police action news in gondia

पोलिसांनी दतोरा येथील राजेश बळीराम वाढई याच्या घरी छापा मारला असता ८ पोत्यांत १७ हजार ६५० रूपयांचे मोहफुल मिळून आले. तर त्याने गावातीलच संतोष प्रेमलाल कुसराम याच्या घरी मोहफुल ठेवल्याचे कळले. पोलिसांनी संतोषच्या घरी छापा मारला असता त्या ठिकाणी ५८ पोत्यात एक लाख ३२ हजार ७५० रूपयांचे मोहफुल मिळुन आले.

intoxicant
पोलिसांनी जप्त केलेले मोहफुलाचे पोते
author img

By

Published : Aug 24, 2020, 8:54 PM IST

गोंदिया - अवैध विक्री करण्यासाठी साठवून ठेवलेले मोहफुलाचे ६६ पोते उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे व त्यांच्या पथकाने गावातील दोघांच्या घरातून जप्त केले. ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम दतोरा येथे ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या मोहफुलाची किंमत १ लाख ५० हजार ४०० रूपये एवढी आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे व त्यांच्या पथकाने २२ ऑगस्ट रोजी ग्राम दतोरा येथील राजेश बळीराम वाढई याच्या घरी छापा मारला असता ८ पोत्यांत १७ हजार ६५० रूपयांचे मोहफुल मिळून आले. तर त्याने गावातीलच संतोष प्रेमलाल कुसराम याच्या घरी मोहफुल ठेवल्याचे कळले.

पोलिसांनी संतोषच्या घरी छापा मारला असता त्या ठिकाणी ५८ पोत्यात एक लाख ३२ हजार ७५० रूपयांचे मोहफुल मिळुन आले. पोलिसांनी एकूण १ लाख ५० हजार ४०० रूपये किंमतीचे ३००८ किलो मोहफुल जप्त केले आहे. आरोपी हे मोहफुल अवैध रित्या दारू बनविणाऱ्यांंना विकणार असल्याचे बोलेले जात आहे. या प्रकरणात आरोपी राजेश वाढई व संतोष कुसराम या दोघांविरूध्द ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.