ETV Bharat / state

गोंदियात प्लाझ्मा सेंटर लवकरच होणार कार्यान्वित; त्रुटी पूर्ण करून पदभरतीही झाली

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्लाझ्माची गरज वाढली आहे. ही गरज ओळखूनच जिल्ह्यातील प्लाझ्मा सेंटर सुरू करण्यात येत आहेत.

गोंदियात प्लाझ्मा सेंटर लवकरच होणार कार्यान्वित

author img

By

Published : Nov 25, 2020, 4:53 PM IST

Updated : Nov 25, 2020, 5:18 PM IST

गोंदिया - दिवाळीनंतर जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दररोजच मृतांची संख्याही झपाट्याने वाढत असल्याचे बघावयास मिळत आहे. आजघडीला कोरोना बाधितांची संख्या ११ हजारचा आकडा पार करून पुढे गेला आहे. तर एकूण मृतांची संख्या १५४ वर पोहोचली आहे. त्यातच लॉकडाऊनचे नियम शिथील केल्याने कोरोनावाढीची बाब गंभीर होत आहे. सध्य स्थितीत कोरोनाने गंभीर असलेल्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी जीवनदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्लाझ्माची मागणी वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर लवकरच जिल्ह्यात प्लाझा सेंटर कार्यन्वित करण्यात येणार आहे.

गोंदियात प्लाझ्मा सेंटर लवकरच होणार कार्यान्वित
गोंदियात प्लाझ्मा सेंटर लवकरच होणार कार्यान्वित

गोंदिया जिल्ह्यात प्लाझ्मा युनिट येऊन ४ महिने लोटले तरी प्लाझ्मा युनिट सुरू झालेली नाही. मात्र आता दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाटत असल्याने आता प्लाझ्मा मशीन सुरू करण्यासाठी ज्या काही त्रुटी आणि टेक्निशियन पद नव्हते, ते आता भरण्यात आले व या आढवाड्यात प्लाझ्मा सुरू करण्यात येण्याचे सांगितले आहे.

या आठवड्यात होणार प्लाझ्मा सुरू-

गोंदिया मेडिकल महाविद्यालय अंतर्गत येत असलेल्या बाई गंगाबाई शासकीय रक्तपेढीला प्लाझ्मा थेरपीसाठी लागणारी परवानगी मिळाली आहे. तसेच रक्तपेढीत प्लाझ्मा थेरपीसाठी लागणारी मशिनही आली आहे. यासाठी एक विशेष युनिट तयार करण्यात आले आहे. युनिटसाठी लागणारी सर्वच तयारी रक्तपेढी विभागाकडून करण्यात आली आहे. यासाठी डोनर्ससाठी तयारी सुरू आहे. अशात या आठवड्यात प्लाझ्मा युनिट सुरू होणार आहे.

कोण देऊ शकतो प्लाझ्मा-

पॉझिटिव्ह व्यक्ती उपचारानंतर बरी झाल्यानंतर २८ दिवसांनी प्लाझ्मा देऊ शकतो. प्लाझ्मा देण्यासाठी त्या व्यक्तींची हिमोग्लोबीनची पातळी चांगली असावी लागते. प्लाझ्मा दान करण्यासाठी अॅन्टीबॉडी टेस्ट आणि प्लाझ्मा संकलित करण्यासाठी तीन तासांचा कालावधी लागत. त्यांच्याप्रमाणे पॉझिटिव्ह व्यक्ती उपचारानंतर बरी झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत प्लाझ्मा डोनेट करू शकतो.

Last Updated : Nov 25, 2020, 5:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.