गोंदिया - शेतकऱ्याचे साडेतीन एकरातील धानाचे पुंजाने जळून खाक झाले आहे. यामुळे ताराचंद सोमा भसाखेत्री या शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ताडगाव येथे ही घटना घडली.
ताराचंद सोमा भसाखेत्री यांची ताडगाव येथे साडेतीन एकर शेती आहे. या शेतीतील धान कापणी करून शेतामध्ये पुंजाने तयार करून ठेवले होते. मध्यरात्री अज्ञात इसमाने या पुंजान्यास आग लावली असून आगीत संपूर्ण पिक जळून राख झाले आहे. सकाळी सहा वाजता दरम्यान लगतच्या शेतकऱ्याने ही माहिती भसाखेत्रे यांना दिली. कैलास ताराचंद भसाक्षेत्री यांच्या तक्रारीवरून अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. घटनेचा पंचनामा करून शासनाने झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशी मागणी ताराचंद भसाखेत्री नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.