ETV Bharat / state

पोलीस भरतीत एकही जागा नाही, ओबीसी तरुणांनी गोदिंयात काढला मोर्चा

author img

By

Published : Sep 12, 2019, 9:09 PM IST

Updated : Sep 13, 2019, 12:18 PM IST

पोलीस भरतीचे ऑनलाईन फॉर्म 23 सप्टेंबरपर्यंत महाऑनलाईन पोर्टलद्वारे भरायचे आहेत. मात्र, या भरतीत ओबीसी समाजाला योग्य प्रमाणात जागा नसल्यामुळे समाजामध्ये असंतोष पसरला आहे.

आंदोलनकर्ते ओबीसी तरुण

गोदिंया - राज्यात 19 जिल्ह्यांमध्ये 3 हजार 357 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, या भरतीत 6 जिल्ह्यांमध्ये इतर मागास प्रवर्गाला (ओबीसी) एकही जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने आज (गुरुवारी) आंबेडकर चौक ते शहराचा मुख्य बाजार आणि चौकातून मोर्चा काढण्यात आला.

पोलीस भरतीत ओबीसी समाजाला कमी जागा असल्यामुळे गोदिंया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीने आंदोलन केले...

हेही वाचा - महिला पोलीस अधीक्षकाने अपघातग्रस्ताला स्वत:च्या गाडीतून रुग्णालयात केले दाखल

पोलीस भरतीचे ऑनलाईन फॉर्म 23 सप्टेंबरपर्यंत महाऑनलाईन पोर्टलद्वारे भरायचे आहेत. मात्र, या भरतीत ओबीसी समाजाला योग्य प्रमाणात जागा नसल्यामुळे समाजामध्ये असंतोष पसरला आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो तरुणांनी या मोर्चात सहभाग घेऊन सरकारचा निषेध केला. तसेच सरकारने ज्या जिल्ह्यात ओबीसींची जागा नाही त्या जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या भरतीत ओबीसींना सामावून घ्यावे, अन्यथा ही भरती रद्द करावी, या मुख्य मागणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले.

हेही वाचा - उत्तरप्रदेशातील 'या' पोलीस ठाण्यात १९ वर्षांत फक्त २ गुन्ह्यांची नोंद

राज्यात 19 जिल्ह्यात शहर पोलीस, ग्रामीण पोलीस तसेच लोहमार्ग पोलीस, अशा विविध विभागांमध्ये 3 हजार 357 पोलीस शिपाई पदाची भरती केली जात आहे. त्यासाठी ऑनलाईन जाहिरात काढण्यात आली आहे. राज्यात ओबीसी प्रवर्गाला 19 टक्के आरक्षण दिले जाते. परंतु, 6 जिल्ह्यात होत असलेल्या पोलीस पदभरतीत ओबीसीला १ टक्केही जागा देण्यात आली नसल्याने हा ओबीसींवर अन्यायच आहे. तसेच बिंदू नामावलीनुसार ओबीसींना जागा मिळाव्या, यासाठी ओबीसींच्या विविध संघटनांच्यावतीने सरकारला निवेदन सादर करण्यात आले असल्याची माहिती ओबीसी संघटनेने दिली आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 12-09-2019
Feed By :- Reporter App 
District :- GONDIA 
File Name :-  mh_gon_12.sep.19_youth movement_7204243

ओबीसींना पोलिस भरतीत डावलण्या मुळे युवकांनी काढला मोर्चा 
Anchor :- राज्यात १९ जिल्ह्यांमध्ये ३ हजार ३५७ पोलिसांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. भरती प्रक्रिया सुरु झाली असुन या भरतीचे ऑनलाईन फॉर्म २३ सप्टेंबर पर्यंत महाऑनलाईन पोटल द्वारा भरायचे आहे. मात्र या रिक्त पदाच्या भरतीत ६ जिल्ह्यां मध्ये इतर मागास प्रवर्गाला एकही जागा देण्यात आलेली नाही. त्या मुळे ओबीसी समाजामध्ये असंतोष पसरला आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो युवा मुल-मुलीं आज या मोर्च्यात सहभागी झाले असुन शासनाने ज्या जिल्यात ओबीसी ची जागा नाही त्या जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या भर्तीत ओबीसींना सामावुन घ्यावे, या अन्यथा हि भरती रद्द करण्यात यावी या मुख्य मागणीला घेउन ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने आज गोंदिया शहरात मोर्चा काढुन्यात आला व शासनाला निवेदन सादर करणार आला. 
VO :-  राज्यात १९ जिल्ह्यातील शहर पोलीस, ग्रामीण पोलीस तसेच लोहमार्ग पोलिस अशा विविध विभागांमध्ये ३ हजार ३५७ शिपाह्यांची पदभरती केली जात आहे. त्याकरीता ऑनलाईन जाहिरात काढण्यात आली आहे. राज्यात ओबीसी प्रवर्गाला १९ टक्के आरक्षण दिले जाते. परंतु ६ जिल्ह्यात होत असलेल्या पोलीस पदभर्तीत ओबीसीला एकही टक्के जागा देण्यात आली नसल्याने हा ओबीसींवर अन्यायच आहे. तसेच बिंदु नामावलीनुसार ओबीसींना जागा मिळाव्या, यासाठी ओबीसींच्या विविध संघटनांच्या वतीने शासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे. मात्र त्यावर शासनाकडुन कोणतीही भुमिका घेण्यात आलेली नाही. ओबीसी विद्यार्थ्यावर शासनाच्या धोरणाने बेरोजगार होण्याची वेळ आली असल्याने या पदभरतीच्या विरोधात जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने आज स्थानिक आंबेडकर चौकातुन मोर्चा काढण्यात आला व शहराच्या मुख्य बाजार व चोकातुन हा मोर्चा काढण्यात आला व या मोर्च्या मध्ये हजारो युवक मूल- मुली सहभागी झाले असुन या भरती मध्ये ओबीसी ची जागा मिळाली पाहिजे या भरती रद्द करण्यात याविओ असे निवेदन उपविभागणीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस याना पाठविण्यात आले आहे
 BYTE :-  बबलु कटरे (  ओबीसी संघर्ष कृती समिती, जिल्हाध्यक्ष)
BYTE:-  हर्षा छोरत (पोलीस भरती देणारी मुलगी)
BYTE:-  अमित गुप्ता (पोलीस भरती देणारी मुलगा)Body:VO :- Conclusion:
Last Updated : Sep 13, 2019, 12:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.