ETV Bharat / state

गोंदियात इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

केंद्र सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे पेट्रोल-डिझेल, गॅसचे दर गगणाला भिडले असल्याचे सांगत शहरातील आंबेडकर चौक परिसरातून या आंदोलनाची सुरूवात करण्यात आली.

गोंदियात राष्ट्रवादीचे आंदोलन
गोंदियात राष्ट्रवादीचे आंदोलन
author img

By

Published : Jul 5, 2021, 7:35 PM IST

Updated : Jul 5, 2021, 7:48 PM IST

गोंदिया - पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे पेट्रोल-डिझेल, गॅसचे दर गगणाला भिडले असल्याचे सांगत शहरातील आंबेडकर चौक परिसरातून या आंदोलनाची सुरूवात करण्यात आली.

इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

केंद्र सरकारवर जोरदार टीका

माजी आमदार राजेंद्र जैन तथा जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर यांनी आंदोलनाची सुरूवात सायकल रॅली काढत केली. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना राजेंद्र जैन म्हणाले, की केंद्र सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे सातत्याने महागाई वाढत आहे. कालच घरगुती गॅसच्या किमती २५ रुपयांनी वाढल्या आहेत, तर पॅट्रोलचे दर तब्बल १०६ रुपयांवर पोहचले आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. जनतेला अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून हातातला रोजगार केंद्र सरकारने हिरावून घेतला आहे.अशा विविध बाबींनी सामान्य माणूस, मजूर, कष्टकरी, छोटे मोठे व्यापारी यांची अक्षरशः वाताहात झाली आहे. यामुळे या सरकारचा करावा तेवढा निषेध कमीच असल्याची भावना यावेळी जैन यांनी व्यक्त केली. यावेळी विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, सुनील भालेराव, सुशीला भालेराव, प्रभाकर दोनोडे, के. बी. चौहान, आशाताई पाटील, कुंदा दोनोडे व सुनील पटले यांनी केंद्र सरकारने सातत्याने वाढवलेल्या महागाईच्या विरोधात जोरदार टीका केली.

हेही वाचा -विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरात सहा वेळा झाले तहकूब

Last Updated : Jul 5, 2021, 7:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.