ETV Bharat / state

Nana Patole : दुसऱ्या पक्षाचे निर्णय इतर पक्ष घेत असतील, हा गैरसमज त्यांनी काढावा.. नाना पटोलेंचा संजय राऊतांना टोला - पंतप्रधान सुरक्षा नाना पटोले प्रतिक्रिया

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole comment on sanjay raut ) म्हणाले की, ज्या पक्षाचे निर्णय त्या पक्षाला घ्यायचे असतात. दुसऱ्या पक्षाचे निर्णय इतर पक्ष घेत असतील, हा गैर समज त्यांनी काढावा, असा टोला नाना पटोले ( Nana Patole ) यांनी संजय राऊतांना लगावला.

Nana Patole comment on sanjay raut
पंतप्रधान सुरक्षा नाना पटोले प्रतिक्रिया
author img

By

Published : Jan 13, 2022, 7:35 PM IST

गोंदिया - येत्या 14 फेब्रुवारीला गोवा येथे विधानसभा निवडणुका होणार असून, या ठिकाणी काँग्रेस स्वबळावर लढणार असून सध्या 17 जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहे. या वर शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Nana Patole comment on sanjay raut ) यांनी माध्यमांशी बोलताना, आम्ही गोव्यात काँग्रेसला 10 जागा मागितल्या आहेत. ज्या जागा काँग्रेसने मागील 50 वर्षांपासून कधी जिंकल्या नाही अशा जागांची मागणी केल्याचे ते म्हणाले होते. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ज्या पक्षाचे निर्णय त्या पक्षाला घ्यायचे असतात. दुसऱ्या पक्षाचे निर्णय इतर पक्ष घेत असतील, हा गैर समज त्यांनी काढावा, असा टोला नाना पटोले ( Nana Patole ) यांनी संजय राऊतांना लगावला.

माहिती देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

हेही वाचा - Tiger killed in Gondia : गोंदियाच्या रामघाट बीटात आढळला वाघाचा मृतदेह; नखं आणि दात गायब

पंतप्रधानांच्या सुरक्षिततेबाबत हलगर्जीपणा सहन करणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Nana Patole on pm modi security breach ) यांना जिवे मारण्याचा कट काँग्रेस हायकमंड आणि पंजाब सरकारने रचल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केले. याला नाना पटोले यांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, ही सर्व चमचेगिरी आहे. पंतप्रधान पद हे गरिमेचे आणि अभिमानाचे पद आहे. याचा दुरुपयोग कुठेही होऊ नये. आम्ही आपले दोन पंतप्रधान गमावले आहेत. म्हणून सुरक्षिततेबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही. पण, भाजपचा सर्व नौटंकीपणा आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने आपल्याकडे वर्ग केले असून ज्या प्रमाणे केंद्रीय गृहमंत्री यांनी पंजाब डीजीपी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, ही जी घाई आहे संमजण्यासारखी आहे. त्यामधूनच खूप समजण्यासारखे आहे. पंतप्रधान दौऱ्याचे सर्व सुरक्षेचे निरीक्षण सर्व काही केंद्रीय गृहमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. मात्र, ज्या दिवशी पंतप्रधान दौऱ्यावर होते त्यावेळी ऐनवेळी रस्ता बदलण्याचे कारण भाजप आणि अमित शहा अजूनही सांगू शकले नाही, असे व्यक्तव्य नाना पटोले यांनी गोंदिया येथे प्रचारसभे दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना केले.

एसटी कामगाराचे वकील गुणवंत सदावर्ते हे वकील आहेत की राजकीय नेते?

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा ( ST employees strike ) विलिनीकरणाच्या मुद्यावर संप सुरू असून काँग्रेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले असून, हे पत्र व्हायरल झाले होते. त्याबाबत खुलासा देताना नाना पटोले म्हणाले की, २० जानेवारी २०२२ ला उच्च न्यायालयाने नेमून दिलेल्या त्री सदस्य समितीची मुदत संपत आहे. समितीने दिलेला अहवाल राज्याला सादर केला असून हा अहवाल एसटी महामंडळाला मान्य नसल्याने आणि त्यांचे वकील गुणवंत सदावर्ते ( Nana Patole on gunratna sadavarte ) हे वकिलीपेक्षा राजकीय नेते जास्त आहेत आणि त्यांच्यासोबत भाजपचे नेते आंदोलनात राहतात आणि हेच भाजपचेच कारस्थान आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजप राजकारण करीत आहे. तुम्ही कामावर परत या. तुमचा तोडगा फक्त काँग्रेस पक्षच काढू शकतो, असे नाना पाटोले आपल्या व्हायरल झालेल्या पत्रावर खुलासा देताना गोंदियात म्हणाले.

हेही वाचा - RTPCR Test Ado : आरटीपीसीआर चाचणीत पुरुषांचे बदलले लिंग.. लहान मुलांचे वय दाखविले 130 वर्ष..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.