गोंदिया - रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल लंपास करणाऱ्या चोरट्याला गोंदिया रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. किशोर साळके (२० वर्ष रा. कुडवा) असे या आरोपीचे नाव आहे.
चोरीचा मोबाईल हस्तगत
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ओडीसातल्या राऊलकेला येथील सुभाष वर्मा हा तरुण ११ मार्च रोजी मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसने प्रवास करत होता. गोंदिया रेल्वे स्थानकावर गाडी थांबवली असताना एका चोरट्याने त्याच्या खिशातून मोबाईल लंपास करत पळ काढला. या प्रकरणाची तक्रार सुभाष वर्मा यांनी गोंदिया रेल्वे पोलिसांकडे केली होती. तक्रार मिळाल्यानंतर पोलीस सायबर सेलच्या मदतीने या चोराचा शोध घेत होते. तपास सुरू असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे यांनी कुडवा येथील किशोर साळके याला 13 जूनला ताब्यात घेतले. त्याच्याकडून संबंधित चोरीचा मोबाई हस्तगत करण्यात आला आहे.
हेही वाचा -Mumbai Corona : धारावी दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा तर वर्षभरात सातव्यांदा रुग्णसंख्या शून्यावर