ETV Bharat / state

अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील आदिवासी लोकांना सॅनिटायझर, मास्कसह शैक्षणिक साहित्याचे वाटप - गोंदिया माऊली फाऊंडेशन कोरोना अपडेट बातमी

गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात वीरमरण आलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मृतीमध्ये दरवर्षी नक्षलवादी २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नक्षल सप्ताह साजरा करतात, तर पोलीसदेखील नक्षलवाद्यांना तोंड देण्यासाठी २० जुलै ते २६ जुलै दरम्यान नक्षल दमन सप्ताह साजरा करून गावोगावी जनजागृती करण्यासाठी मेळावे घेतात. याचाच एक भाग म्हणून नागपुरातील माउली फाउंडेशन आणि रोटरी क्लब नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बोन्डे या गावात आज साहित्य वितरण आणि जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

gondiya corona
gondiya corona
author img

By

Published : Jul 30, 2020, 3:09 PM IST

गोंदिया - सध्याच्या घडीला कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतच चालेला आहे. त्यातच कोरोना शिरकाव आता ग्रामीण भागातही सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक गाव-खेडे आहेत त्या ठिकाणी आजही कोरोना संसर्गाबाबत ज्याप्रमाणे माहिती व जनजागृती झाली पाहिजे त्याप्रमाणे झालेली नाही. अशाच ग्रामीण भागातील मुलांना या कोरोनामुळे शाळेत जाणेही बंद झाले आहे. त्यामुळे त्यांचे शिक्षणाकडेही दुर्लक्ष होत चालले आहे. अशा ग्रामीण भागातील लोकांसाठी नागपूर येथील माऊली फाउंडेशन आणि रोटरी क्लब समोर येऊन मदतीचा हात पुढे करत आहे. चला तर बघू ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट…

गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भाग असलेल्या देवरी तालुक्यातील जंगल परिसरात असलेले बोन्डे एओपी (नक्षल विरोधक पथक) अंतर्गत येणाऱ्या बोन्डे या गावातील आदिवासी लोकांना कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दूर कसे राहावे याबाबत माहिती दिली. त्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझर, साबन तसेच मास्कचे वाटप करण्यात आले. तर गावातील शालेय विद्यार्थ्यांना या लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने शिक्षणाची लय तुटू नये यासाठी शैक्षणिक साहित्य ही वाटप करण्यात आले.

दुसरीकडे गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात शहीद झालेल्या नक्षलवाद्यांच्या स्मृतीमध्ये दरवर्षी नक्षलवादी २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान नक्षल सप्ताह साजरा करतात, तर पोलीसदेखील नक्षलवाद्यांना तोंड देण्यासाठी २० जुलै ते २६ जुलै दरम्यान नक्षल दमन सप्ताह साजरा करून गावोगावी जनजागृती करण्यासाठी मेळावे घेतात. याचाच एक भाग म्हणून नागपुरातील माऊली फाउंडेशन आणि रोटरी क्लब नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बोन्डे या गावात आज साहित्य वितरण आणि जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

नागपुरातील माऊली फाउंडेशनच्या वतीने गोंदिया जिल्ह्याच्य्या अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांना वेळो-वेळी जीवन उपयोगी साहित्य पुरविले जाते. रक्षा बंधनाचा सण ३ ऑगस्टला आहे. आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भागात सेवा देणाऱ्या पोलिसांना रक्षा बंधनाला सुट्टी मिळत नसल्याने ते आपल्या बहिणीकडे राखीचा सण साजरा करु शकत नसल्याने अशा पोलीस शिपायांना माउली फाउंडेशनच्या वतीने राख्या बांधण्यात आल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.