गोंदिया - जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील सुपलीपार गावातील एका व्यक्तीने ६० वर्षीय आईसह ३२ वर्षीय पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना आहे. ही घटना गुरूवारी पहाटे उघडकीस आली. आनंदाबाई शालिकराव गजभिये आणि पुनम राजेश गजभिये असे मृतांची नावे आहेत. तर राजेश शालिकराम गजभिये असे आरोपीचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
हेही वाचा - धनंजय मुंडेंच्या 'त्या' वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून दखल; सुमोटो दाखल
आमगाव तालुक्यात सुपलीपार येथे राजेश शालिकराम गजभिये हा कुटुंबासह राहत होता. राजेश-पुनमला यांना 3 अपत्ये आहेत. नेहमी प्रमाणे जेवण केल्यानंतर गजभिये कुटुंब झोपले होते. दरम्यान, त्याने मध्यरात्रीच्या सुमारास लोखंडी सळाखीने झोपलेल्या आई आनंदाबाई शालिकराम गजभिये आणि पत्नी पुनम राजेश गजभिये या दोघांवर वार केले. सकाळी झोपेतुन उठलेल्या मुलींनी रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या आई व आजीची माहिती शेजारच्यांना दिली. यावरून आरोपी राजेशने दोघींची हत्या केल्याची बाब समोर आली.
हेही वाचा - 'एक नारी, पड गयी सब पर भारी'... प्रणिती शिंदे यांच्या समर्थकांचा जल्लोष!
फिर्यादी पोलीस पाटीलच्या तक्रारीवरून आमगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा केला. आरोपी राजेशने आई व पत्नीची हत्या का केली या बाबीचे निश्चित कारण कळु शकले नाही. दोन्ही मृत देह ला सविच्छेदन करण्यासाठी आमगाव येथे रुग्णालयात नेण्यात आले आहे. सध्या आरोपी फरार आहे. तर आमगाव पोलीस त्याचा शोध घेत आहेत.