गोंदिया - गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी शाळा मजितपूर ( Government Tribal School Majitpur ) काही काही मुले, मुली टेंपोमध्येच बेशुद्ध ( Students fainted at Majitpur Ashram School ) झाले होते. या प्रकरणी शासकीय आदिवासी शाळेच्या मुख्यध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी शाळा मजितपूर ( Government Tribal School Majitpur ) येथील १२० आदिवासी मुलं मुली खेळण्यासाठी एकाच टेंपो मध्ये कोंबून नेण्यात आले. त्यामुळे काही मुले, मुली टेंपोमध्येच बेशुद्ध (Students fainted at Majitpur Ashram School ) झाले. त्यांना एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. तर, एका मुलीला गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
खेळण्यासाठी जात असताना घडला प्रकार - या विद्यार्थ्यांना कोयलारी या आश्रम शाळेत खेळण्यासाठी घेऊन जात असताना हा प्रकार घडला ( Tribal Ashram School Students Unconscious ) आहे. अखेर गाडीत मोठा गोंधळ उडाल्यानंतर गाडी थेट एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेला वळवण्यात आली. कोयलारी आश्रम शाळेवरून परतताना हा प्रकार घडला आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर एका मुलीला उपचारासाठी गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.
विद्यार्थी बेशुद्ध - शासकीय आदिवासी शाळा मजितपूर येथील विद्यार्थी आहेत. या सर्वांना कोयलारी या आश्रम शाळेत खेळण्यासाठी घेऊन जाण्यात आले. तिथून परत येतांना हा प्रकार घडला. परत असताना काही विद्यार्थी बेशुद्ध पडले गाडीत गोंधळ उडाला. अखेर गाडी थांबवण्यात आली. तिथे असलेल्यांना समजत नव्हतं. त्यामुळे तातडीन सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत.
मुख्याध्यापक निलंबित - महाराष्ट्र राज्यात डोंगराळ, दुर्गम भागात राहणाऱ्या अनुसूचित जमातीची सामाजीक, शैक्षणिक प्रगती होण्यासाठी सन १९७२-७३ पासून क्षेत्रविकासाचा दृष्टीकोन स्विकारण्यात आला. अशा भागाचा मूलभूत विकास व्हावा. त्याचा फायदा सर्वांना व्हावा यासाठी तेथे मूळ केंद्रस्थान म्हणून आश्रमशाळा आसावी या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांची इ. १२ वी पर्यंतच्या शिक्षणाची महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आलेली आहे. गोंदिया जिल्ह्यातील मजीतपुर येथे आदिवासी विभागाची माध्यमिक, उच्च माध्यमिक निवासी आश्रम शाळा नियमितरित्या सुरु आहे.
टेम्पोतून विद्यार्थांना कोंबले - सत्र २०२२-२३ मध्ये विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा याकरिता दिनांक २२ सप्टेंबर ते २४ सप्टेंबरपर्यंत आदिवाशी आश्रम शाळा येथे क्रिडा स्पधेर्चे आयोजन करण्यात आले होते. व या क्रिडा स्पर्धेकरिता मजीतपूर येथील एकूण उच्च माध्यमिक गटातील १२० विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांची संपूर्ण जवाबदारी ही मुख्याध्यापक, संबधीत क्रिडा शिक्षकाची होती. परंतु मजीतपूर येथील मुख्याध्यापक एस.के.थूलकर, क्रिडा शिक्षक एन.टी.लिल्हारे यांनी आपल्या कर्त्यव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आले आहे. सहभागी विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी बसची सुविधा करणे गरजेचे होते. परंतु, मुख्याधापकांनी बसची सुविधा पुरविता खाजगी मिनी मालवाहक (४०७) टेम्पो मधून विद्यार्थांना क्रिडा स्पर्धेसाठी नेण्यात आले. २४ सप्टेंबर रोजी क्रिडा स्पर्धा संपताच या १२० विद्याथ्यार्ना या मालवाहकामध्ये जनावरांप्रमाणे कोंबून आणण्यात आले होते.त्यामुळे काही विद्याथ्यार्ना प्राणवायूची कमतरता जाणू लागली.
१२ विद्याथ्यार्ची प्रकृती खालावली - एकोडी जवळ १२ विद्याथ्यार्ची प्रकृती खालावल्याने तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्यात आले. त्यापैकी एका विद्यार्थिनीला गोंदिया येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले. सदर प्रकरणाची माहिती समजताच तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले यांनी तातडीने आश्रम शाळेत भेट देऊन हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली. अप्पर आयुक्त यांनी आमदारांनी केलेल्या तक्रारीमुळे मुख्यध्यापकांना निलंबित करण्यात आले.
मुनगंटीवारांनी गेतली गंभीर दखल - या प्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेतली असून या घटनेच्या चौकशीचे दिले आहेत. त्याच बरोबर जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विद्यार्थ्यांना तात्काळ उपचार मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत.