ETV Bharat / state

तिरोडा तालुक्यात पुन्हा टोळधाड; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

मध्य प्रदेशातून विदर्भातील अमरावती, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात दाखल झालेली टोळधाड पुन्हा मध्य प्रदेशात परतली होती. टोळधाड मध्य प्रदेशात गेल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला होता. मात्र, आता आठवडाभरानंतर टोळधाड पुन्हा विदर्भात दाखल झाल्याने शेतकऱ्यांसह कृषी अधिकाऱ्यांची चिंता देखील वाढली आहे.

Locusts
टोळधाड
author img

By

Published : Jun 12, 2020, 9:07 PM IST

गोंदिया - गेल्या काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातून टोळधाड मध्यप्रदेशकडे सरकली होती. मात्र, आज पुन्हा जिल्ह्यावर टोळधाडीचे संकट घोंगावत असल्याचे दिसले. गुरुवारी नागपूर जिल्ह्याची हद्द ओलांडत भंडारा जिल्ह्यात दाखल झालेली टोळधाड आज गोंदिया जिल्ह्यतील तिरोडा तालुक्यातील सरांडी, पांजरा, मुंडिकोटा, नवेगावसह 10 ते 14 गावांमध्ये दाखल झाली. त्यामुळे खरिप पेरणीच्या तयारीत गुंतलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तिरोडा तालुक्यात पुन्हा दाखल झालेली टोळधाड

तिरोडा तालुक्यात दाखल झालेल्या टोळधाडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाच्यावतीने सकाळीच औषधी फवारणी करण्यात आली आहे. सध्या काचेवानीमार्गे ही टोळधाड पुन्हा मध्यप्रदेशच्या दिशेने जात असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक गणेश घोरपडे यांनी दिली. उद्या पहाटेच्या सुमारास पुन्हा औषध फवारणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मध्य प्रदेशातून विदर्भातील अमरावती, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यात दाखल झालेली टोळधाड पुन्हा मध्य प्रदेशात परतली होती. त्यासाठी कृषी विभागाकडून व्यापक प्रयत्न करण्यात आले. कृषी आयुक्तालयाकडून फवारणीसाठी ड्रोनदेखील उपलब्धत करून देण्यात आले. टोळधाड मध्य प्रदेशात गेल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला होता. मात्र, आता आठवडाभरानंतर टोळधाड पुन्हा विदर्भात दाखल झाल्याने शेतकऱ्यांसह कृषी अधिकाऱ्यांची चिंता देखील वाढली आहे. खरीप हंगाम दारावर असल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. काही भागात पाऊस पडल्याने पेरणीचे कामही सुरू झाले आहे. काही भागात धान अंकुरले असल्याने ही टोळधाड त्याचा फडशा पाडेल की काय याची भीती आहे.

दहा किमी लांब आणि दोन किमी रूंद टोळधाड तिच्या मार्गातील सर्व प्रकारच्या हिरव्या पानांवर हल्ला करून संपवून टाकते. या किडीचे थवे १२ ते १६ किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने उडतात. वाळवंटी टोळ किंवा नाकतोडा ही एक महत्त्वाची कीड असून जेव्हा ही कीड समूहाने आढळून येते तेव्हा ती मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. वाळवंटी टोळ आपली अंडी रेतीमध्ये १० ते १५ सेंटिमीटर आत समूहाने घालतात. एक मादी साधारणत दीडशे ते दोनशे अंडी घालते. सर्वसाधारणपणे दहा ते बारा दिवसात ती अंडी उबवतात. त्यांची पिल्लावस्था २२ दिवसात पूर्ण होते आणि प्रौढावस्थेत आलेले हे कीडे लांबपर्यंत उडून नुकसान करते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.