गोंदिया - शहरात एका अवैध कारखान्यावर बनावटी दारू तयार करत असल्याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथकाद्वारे सापळा रचून कारखान्यावर धाड टाकली. या कारवाईत १९ जणांना अटक करण्यात आली असून ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोंदिया येथील सरस्वती शिशु मंदिर जवळ बाजपेयी वॉर्ड येथील पैकनटोली येथे बनावटी देशी मद्य बनवणारा अवैध कारखाना सुरु होता. मिळालेल्या माहितीच्या आधारावर उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकली. या कारवाईत कारखान्यात अवैधरित्या देशी दारू तयार करण्याचे काम सुरु असल्याचे आढळले. राज्य उत्पादन शुल्कने कार्यवाही करत स्पिरिट, पाणी व अर्क याचा वापर करून बनावटी देशी दारू बनवून तसेच देशी मद्यचे बनावटी लेबल लावलेल्या बाटलीत भरण्याचे व ते सीलबंद करण्याचे काम चालू होते.
या कारवाईत १९ जणांना अटक केली असून घटना स्थळावरून १ हजार १७५ लीटर स्पिरिट, ४५ बनावटी देशी मद्यच्या पेट्या, ९० मिली क्षमतेचे सुपर सॉनीक रॉकेट संत्रा या नावाचे लेबल असलेल्या ३ हजार देशी मद्यच्या रिकाम्या बाटल्या, १० हजार बुच, २ बाटल्या अर्क, इलेक्ट्रानिक मोटार, स्पिरिट वारसाचे २०० लिटर क्षमतेचे १४ प्लास्टिक रिकामे ड्रम व ५५ पाण्याचे रिकामे कँन असा एकूण ३ लाखाचा मुद्देमालासोबत १९ आरोपीना अटक केले. आरोपीमध्ये आनंद नागपुरे (वय २१), राहुल ओमकारकर (वय २०), लतेश लक्केवार (वय २३), करण अंबादे (वय १९), तिरेंद्र सोनवाने (वय १९), सोनु सोनवाने (वय २०), पवन सहारे (वय ३०), संतोष रहांगडाले (वय २८), मनोज शिवणकर (वय ३८), नितेश रॉय (वय ३०), कमलेश धाकडे (वय १९), सागर सोमलपुरे (वय २४), कपिल लुयीयॉ (वय २५), स्रेहील हिरकणे (वय २१), तरूण टेंभुर्णे (वय १९), कूणाल धकाते (वय २०), सुरेश मेश्राम (वय ६६), पराग अग्रवाल (वय २५), घनश्याम हुड (वय ३९) यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.