गोंदिया - आमगाव तालुक्यातील कुंभारटोली गावात विजेचा शॉक देऊन हरिणीची (चितळांची) शिकार करून मटण विक्री करताना वन विभागाने 7आरोपींना अटक केले आहे. तर दोन आरोपी फरार झाले आहेत. विक्रीसाठी आणलेले चितळांचे मांस अधिकाऱ्यांनी जप्त केले.
आरोपींनी बुधवारी रात्री कुंभारटोली परिसरात असलेल्या एका शेताच्या तारेला विजेचा शॉक देऊन ठेवला होता. त्यानंतर काही कालावधीनंतर म्हणजेच रात्री 10 वाजता तारेला एक चितळ चिकटला. आरोपीच्या टोळीने त्या चितळाला बाजूला केले व त्याचे मांस भाजले. आज (गुरुवारी) सकाळी ते शिल्लक मांस विक्रीसाठी आणले होते. वन अधिकाऱ्यांनी शक्कल लढवत ग्राहक बनून मांस खरेदी करायला गेले, व त्यांना रंगेहाथ पकडले. एकुण 9 आरोपींपैकी दोन आरोपी यावेळी फरार झाले. त्यांची चौकशी केल्यानंतर एका आरोपीने याआधी देखील निल गायीची शिकार केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
चितळाविषयी -
चितळ 30 ते 35 किलो वजनाचे होते. यापासून आरोपींना २५ किलोच्यावर मटण मिळणार होते. या मटणाला जरी बाजारभाव नसला तरी 300 रुपये प्रतिकिलो दराने आरोपींना 7500 रुपये मिळाले असते, अशी माहिती आमगावचे वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्ने यांनी दिली.