गोंदिया - रेल्वे कर्मचारी महिलेचा विनयभंग करुन मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी एकाला अटक केली असून रेल्वे पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकेश अशोक लाडे (३२ वर्ष रा. अर्जुनी मोरगाव ) असे आरोपीचे नाव आहे.
एकटी असल्याचा फायदा-
पिडिता गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगांव रेल्वे फाटक कंट्रोल रूममध्ये कामाला आहेत. रूममध्ये त्या एकट्या असल्याचा फायदा घेत आरोपी रुममध्ये शिरला आणि मारहाण करत त्यांचा विनयभंग केला. या घटनेनंतर पीडितेने अर्जुनी मोरगाव पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली.
अवघ्या २४ तासात आरोपीला अटक-
तक्रार दाखल झाल्यानंतर तपासाची सुत्रे फिरवत अवघ्या २४ तासात रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्या विरोधात ६६/२०२० कलम ३५३, ३५४, ४४८, ३२३, भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- पुणे : सारसबागेसमोर डंपरखाली चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
हेही वाचा- वाळू माफियांचा धुडगूस; कारवाई करायला गेलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ