गोंदिया - येथील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शासकीय वसाहत तयार करण्यात आली होती. मात्र, या वसाहतीत अधिकारी, कर्मचारी राहत नसल्याने सध्या या वसाहती जनावरांचे गोठे झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या बाजूला कोट्यवधी रुपये खर्चून शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या राहण्यासाठी वसाहत तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, या ठिकाणी अधिकारी-कर्मचारी स्वतः न राहता ते आपले जनावरे येथे बांधत आहेत. तर त्या परिसरात जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थान आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात चालले तरी काय असा प्रश्न पडत आहे.
गोंदिया जिल्ह्याची स्थापना १ मे १९९९ या वर्षी करण्यात आली. गोंदिया हा नक्षलग्रस्त जिल्हा असून आजही या ठिकाणी बहुतांशी अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नसून येऊन-जाऊन करत आहेत. जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्हापरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिकारी व कर्मचारी यांच्या वसाहत तयार करून दिल्या आहेत. मात्र, आज या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी राहत नाही त्यामुळे ही वसाहत एखाद्या हॉरर सिनेमाच्या खंडर झाल्या सारखे दिसत आहे. तर या वसाहतीत कोणी ही राहत नसल्याने या रिकाम्या वसाहतीत सध्या गाई व म्हैस बांधत असल्याचे समोर आले आहे. या वसाहतीत गाय बांधत दिसल्याने विचारणा केली. ही माहिती मिळाली की ही गाय गोंदिया जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांची ही गीर प्रजातीची गाय आहे. या रिकाम्या इमारतीत ठेवली आहे. मात्र, तत्कालीन पोलीस अधीक्षक यांची बदली झाली असली तरी त्यांचे कुटुंब मात्र या ठिकाणीच वास्तव्य करीत आहेत.
तत्कालीन पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांना या गाई विषयी विचारणा केली असता त्यांनी ही गाय आपली नसल्याचे सर्व आरोप फेटाळले आहेत. तर पोलीस अधिकारीच गाय बांधत असतील तर मग इतर अधिकाऱ्यांनी का मागे राहावे असल्याचे समोर आले की याच वसाहतीच्या दुसऱ्या इमारतीत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्यांनी सुद्धा साहेबांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आपली म्हैस या इमारतीत ठेवली आहे. त्यामुळे ही वसाहत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी आहे जनावरांचे गोठे आहे, असा सवाल सर्वसान्य नागरिक विचारत आहे.