ETV Bharat / state

गोंदियातील आरोग्य सेविकांचा नागपुरातील 'कोरोना'च्या प्रशिक्षणास जाण्यास नकार - गोंदिया कोरोना अपडेट न्यूज

जिल्ह्यात मेडिकल कॉलेज असतानाही बाहेर जाऊन का प्रशिक्षण देण्यात येत आहे, तसेच एएनएम लोकांना साधा व्हेंटिलेटर समजत नसताना त्यांना त्याचे प्रशिक्षण देणे योग्य आहे का, असे प्रश्न आज गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपस्थित असलेल्या १२ आरोग्य सेविकांनी केला असून प्रशिक्षणास जाण्यास नकार दिला.

gondiya-health-helper-refused-going-to-covid-19-workshop-in-nagpur
गोंदियातील ९० आरोग्य सेविकांना 'कोरोना'च्या प्रशिक्षणासाठी बोलावले, उपस्थित १२ जणींकडून नागपूरला जाण्यास नकार
author img

By

Published : Mar 29, 2020, 11:47 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील महिला आरोग्य सेविकांनी नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात देण्यात येणाऱ्या 'कोविड १९'च्या व्हेंटिलेटर प्रशिक्षणासाठी जाण्यास दिला नकार दिल्याची घटना समोर आली आहे. यामुळे जिल्हा आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

गोंदियातील आरोग्य सेविकांचा नागपुरातील 'कोरोना'च्या प्रशिक्षणास जाण्यास नकार

गोंदियातील ९० आरोग्य सेविकांना नागपूर येथे वैद्यकीय महाविद्यालयात सोमवार (३० मार्च)पासून पाच दिवसीय 'कोविड १९' व्हेंटिलेटर प्रशिक्षण देण्यात येणार होते. मात्र जिल्ह्यातील ९० आरोग्य सेविकांना बोलविले असताना त्यापैकी फक्त १२ आरोग्यसेविका आज जाण्याच्या वेळेपर्यंत हजर झाल्या होत्या. तसेच गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयातील १० आरोग्य सेविकांनाही या प्रशिक्षणा करता जायचे होते. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयातील एकही आरोग्यसेविका न आल्याने जिल्हा आरोग्य विभागात मोठी खडबळ उडाली आहे.

जिल्ह्यात मेडिकल कॉलेज असतानाही बाहेर जाऊन का प्रशिक्षण देण्यात येत आहे, तसेच एएनएम लोकांना साधा व्हेंटिलेटर समजत नसताना त्यांना त्याचे प्रशिक्षण देणे योग्य आहे का, असे प्रश्न आज गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात उपस्थित असलेल्या १२ आरोग्य सेविकांनी केला असून प्रशिक्षणास जाण्यास नकार दिला. या सर्व लोकांना आज संध्याकाळी ४ वाजेपर्यंत रुग्णालयात बोलविण्यात आले होते. मात्र, ६ वाजूनही बाकी आरोग्यसेविका उपस्थित न झाल्याने आलेल्या १२ आरोग्य सेविकांनी प्रशिक्षणाकरता जाण्यास नकार दिला. मात्र आरोग्य विभागाने आदेश देऊनही हजर न राहणाऱ्या आरोग्य सेविविकांवर आरोग्य विभाग काय कार्यवाही करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.