ETV Bharat / state

जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती तीन लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

कंत्राटदार देयक काढून देण्यासाठी ३ लाखांची लाच मागणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षण सभापतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.

रमेश अंबुले
रमेश अंबुले
author img

By

Published : Jan 24, 2020, 10:33 PM IST

गोंदिया - एक कंत्राटदार देयक काढून देण्यासाठी ३ लाखांची लाच मागणाऱ्या काँग्रेसच्या जिल्हा परिषद शिक्षण सभापती रमेश अंबुले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज (शुक्रवार) रंगेहाथ पकडले. ह्या अगोदरही भाजपचे समाजकल्याण सभापती विश्वजित डोंगरे यालासुद्धा लाच घेताना अटक करण्यात आली होती.

गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि भाजप युतीची सत्ता आहे. तक्रारदाराने विद्युतीकरणाच्या मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविलेली काही कामे मंजूर न झाल्याने ते जि.प. सभापती रमेश अंबुले यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटले. यावेळी अंबुले याने थांबवून ठेवलेली देयके काढण्यास सांगतो मात्र, मागच्यावेळी बोलल्याप्रमाणे तुम्ही मला पैसे दिलेले नाहीत, असे सांगून तक्रारदाराला ४ लाखांची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने २१ जानेवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली.

तक्रारदाराची थांबवून ठेवलेली कामाची देयके, मागील प्राप्त झालेल्या देयकांची व उर्वरित विद्युतीकरणाच्या कामाची देयके काढून देण्याकरिता लाचखोर अंबुले याने २० टक्क्यांप्रमाणे ४ लाख रुपये लाचेची मागणी केली. तर, तडजोडीअंती १५ टक्क्याप्रमाणे ३ लाख रुपये देण्याचे ठरले. दरम्यान ३ लाख रुपये लाच घेताना आज अंबुले यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

हेही वाचा - गोदिंया जिल्ह्यात २०१९ मध्ये अपघाताचे प्रमाण १० टक्क्यांनी घटले

गोंदिया जिल्हा परिषदेतील सभापतींना लाच घेताना अटक होण्याची ही दुसरी घटना आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिक आता जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले आहेत.

हेही वाचा - धक्कादायक..! शासकीय राजमुद्रेचे बनावटी नियुक्तीपत्र देऊन ७८ बेरोजगारांना लाखों रुपयाने फसविले

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 24-01-2020
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_24.jan.20_acb_7204243
जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती अंबुले तीन लाख रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
Anchor :- एका कंत्राटदार देयक काढून देण्यासाठी तीन लाख रूपयाची लाच मागणार्या लाचखोर काँग्रेसच्या शिक्षण जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ह्या अगोदर ही भाजपाचे समाजकल्याण सभापती विश्वजित डोंगरे यालासुद्धा लाच घेताना अटक करण्यात आली होती.
VO :- गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि भाजपा युतीची सत्ता आहे. तक्रारदाराने विद्युतीकरणाची मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविलेले काही कामे मंजुर न झाल्याने ते जि.प. सभापती रमेश अंबुले यांना त्यांच्या कार्यालयात जावून भेटले. यावेळी अंबुले याने थांबवून ठेवलेली देयके काढण्यास सांगतो. मात्र मागच्यावेळी बोलल्या प्रमाणे तुम्ही मला पैसे दिलेले नाहीत असे सांगून तक्रारदाराला 4 लाख रुपयांची मागणी केली. सदर लाच रक्कम देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्यामुळे त्यांनी 21 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. तक्रारदाराचे थांबवून ठेवलेले कामाचे देयके, मागील प्राप्त झालेल्या देयकांची व उर्वरीत विद्युतीकरणाच्या कामाचे देयके काढून देण्याकरिता रमेश अंबुले याने 20 टक्क्याप्रमाणे 4 लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 15 टक्क्याप्रमाणे 3 लाख रुपये देण्याचे ठरले. दरम्यान 3 लाख रुपये लाच आज घेताना जि.प. सभापती रमेश अंबुले यांना लाचलुचपत विभागाने लाच घेताना रंगेहाथ अटक केले. गोंदिया जिल्हा परिषदेतील सभापतींनी लाच घेताना आटक होण्याची दुसरी घटना असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिक आता जिल्हा परिषदेतील पदाधिकार्याच्या काय्र्शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करु लागले आहेतBody:VO:-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.