ETV Bharat / state

गोंदियात कोरोनाचा पहिला रुग्ण; लक्षणे नसतानाही रिपोर्ट पॉझिटिव्ह - थायलंड

तरुण हा छत्तीसगड राज्यातील काही मित्र आणि नातेवाईकांसोबत थायलंडला फिरायला गेला होता. १७ मार्चला गोंदियात दाखल झाला. मात्र, कोरोनाची कुठलीच लक्षणे नसल्याने त्याने कुठलीही तपासणी केली नाही.

gondia youth who had  Thailand travel history tested corona positive
गोंदियात कोरोनाचा पहिला रुग्ण; लक्षणे नसतानाही रिपोर्ट पॉझिटिव्ह
author img

By

Published : Mar 27, 2020, 7:43 PM IST

Updated : Mar 27, 2020, 10:49 PM IST

गोंदिया - विदर्भात नागपूर पाठोपाठ आता गोंदिया जिल्ह्यातही २३ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. संबंधित तरुण थायलंडहून परतल्याची माहिती आहे. सुरुवातीला कोरोनाची कुठलीही लक्षणे नसलेल्या तरुणाला कोरोनाची लागण झाल्याने भीतीचे वातावरण आहे.

गोंदियात कोरोनाचा पहिला रुग्ण; लक्षणे नसतानाही रिपोर्ट पॉझिटिव्ह

तरुण हा छत्तीसगड राज्यातील काही मित्र आणि नातेवाईकांसोबत थायलंडला फिरायला गेला असून तो १७ मार्चला गोंदियात दाखल झाला होता. मात्र, त्याला कोरोनाची कुठलीच लक्षणे नसल्याने त्याने कुठलीही तपासणी केली नाही. त्याच्याबरोबर गेलेल्या छत्तीसगढ येथील नातेवाईक आणि मित्रांना कोरोना झाल्याने तरुणाने २५ मार्चला गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जाऊन तपासणी केली. यानंतर सदर तरुणाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र, कुठलीही लक्षणे नसतानाही त्याचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आल्याने गोंदिया आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

तरुणाच्या कुटुंबातील चार इतर लोकांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्यांचेही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सदर तरुण व्यक्तीच्या संपर्कात अजून किती लोक आले, मोलकरीण तसेच त्याच्या कुटुंबाचीदेखील तपासणी आता आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे.

गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 129 लोक विदेशातून परत आली असून त्यांच्या संपर्कात 613 व्यक्ती आल्या आहेत. एकूण ७४२ लोकांना त्यांच्या घरी विलगीकरणासाठी ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ५ संशयित व्यक्तीचे नमुने निगेटिव्ह आले असून आज एकजण पॉझिटिव्ह आल्याने गोंदियावासियांनी आता तरी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Last Updated : Mar 27, 2020, 10:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.