ETV Bharat / state

‘अ’ श्रेणीचा दर्जा मिळताच रेल्वे स्थानकात चोख बंदोबस्त, प्रवाशांना ३० मिनिटापूर्वी येण्याची सूचना - गोंदिया रेल्वे स्टेशन बातमी

गोंदिया येथील रेल्वेस्थानकावरील सोई-सुविधा व प्रवाशांची संख्या बघता या रेल्वेस्थानकाला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात आला आहे. हा दर्जा मिळताच रेल्वे स्थानकावर कोणतेही अनुचित प्रकार घडु नये व प्रवाशांना सुखरूप प्रवास करता यावा, या हेतुने विशेष सुरक्षा व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.

गोंदिया रेल्वे स्थानकाला 'अ' श्रेणीचा दर्जा
author img

By

Published : Sep 29, 2019, 11:07 AM IST

गोंदिया - नागपूरनंतर सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वेस्थानक म्हणुन गोंदिया नावारूपास आले आहे. गोंदिया येथील रेल्वेस्थानकावरील सोई-सुविधा व प्रवाशांची संख्या बघता या रेल्वेस्थानकाला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात आला आहे. हा दर्जा मिळताच रेल्वे स्थानकावर कोणतेही अनुचित प्रकार घडु नये व प्रवाशांना सुखरूप प्रवास करता यावा, या हेतुने विशेष सुरक्षा व्यवस्था २८ सप्टेंबर पासुन सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने प्रवाशांना त्यांच्या सोयीच्या असलेल्या प्रवासी गाडीनुसार रेल्वे स्थानकावर ३० मिनिटे अगोदर येण्याची सुचनाही रेल्वे प्रबंधकांनी केली आहे.

गोंदिया रेल्वे स्थानकाला 'अ' श्रेणीचा दर्जा, सुरक्षेत वाढ

केंद्र शासनाचा रेल्वे विभाग देशातील महत्वपूर्ण, अधिक प्रवासी आवागमन तसेच अधिक महसुल देणाऱ्या रेल्वे स्थानकांना ‘अ’ श्रेणीचा दर्जा देत आहेत. त्या अनुषंगाने गोंदिया रेल्वेस्थानकालाही हा दर्जा मिळाला आहे. विशेष म्हणजे गोंदिया जंक्शनही आहे. गोंदियावरून लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यासह बरौनीपर्यंत रेल्वे प्रवास करता येतो. याशिवाय आंधप्रदेश व तेलंगणा राज्याला जोडणारा बल्लारशा रेल्वे मार्गही आहे. यामुळे या रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे मोठे आवागमन असते. विदर्भातील नागपुरनंतर सर्वाधिक उत्पन्न देणारे गोंदिया हे रेल्वेस्थानक ठरले आहे. त्या अनुषंगाने रेल्वेस्थानकाला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात आला आहे. हा दर्जा प्राप्त झाल्याने रेल्वेस्थानकाला सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन भक्कम करण्याचा प्रयत्न रेल्वे विभागाने सुरू केला आहे. ज्या प्रकारे विमानतळावर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करून येजा करण्यासाठी एक मुख्य द्वार सुरू ठेवला जातो तशीच सुरक्षा २८ सप्टेंबरपासुन गोंदिया रेल्वे स्थानकावर करण्यात आली आहे. एकंदरीत ‘अ’ श्रेणीचा दर्जा मिळाल्याने रेल्वे विभागाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यत आली असून बाकी द्वार बंद करण्यात आले आहे.

हेही वाचा - गोंदिया : नवरात्रोत्सोवाची तयारी सुरू; मंदिरांच्या रंगरंगोटीला सुरुवात, मूर्तीकारही व्यस्त
गोंदिया रेल्वेस्थानकाच्या पश्चिम दिशेला मालधक्का व कुडावा लाईन परिसराच्या दोन्ही बाजूला फुट ओवरब्रिज आहे. मात्र, रेल्वे विभागाने यावरून आवागमन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आता रेलटोली परिसरातील बुकिंग कार्यालय व प्लॅटफार्म क्र. १ वरच आवागमन करता येणार आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकाच्या पश्चिम भागात राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होणार असून प्रवाशांना प्लॅटफार्म क्र. ४, ५, व ६ वर जाण्याकरीता मोठे अंतर कापावे लागणार आहे.

हेही वाचा - गोंदियात रस्ता दुरुस्तीसाठी चिरेखनीकरांचे रास्ता रोको
फुट ओवरब्रिजसह रेल्वेस्थानकाच्या मध्यभागी असलेल्या पुलावरून आगमन व निकासी मार्ग २८ सप्टेंबरपासुन बंद करण्यात आला आहे. रेल्वेस्थानकात प्रवासी व्यतीरिक्त इतर कुणालाही प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन हा निर्णय चांगला असला तरी याचा फेर विचार करून मालधक्का व कुडावा लाईन परिसरातील फुट ओवरब्रिज सुरू ठेवावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 28-09-2019
Feed By :- Reporter App 
District :- GONDIA 
File Name :-  mh_gon_28.sep.19_railway station a grade_7204243
‘अ’ श्रेणीचा दर्जा मिळताच रेल्वे स्थानकात चोख बंदोबस्तप्रवाशांना
३० मिनिटापुर्वी येण्याची सुचना
Anchor :- नागपुरनंतर सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वेस्थानक म्हणुन गोंदिया नावारूपास आला आहे. गोंदिया येथील रेल्वेस्थानकावरील सोई-सुविधा व प्रवाशांची संख्या बघता या रेल्वेस्थानकाला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात आला आहे. हा दर्जा मिळताच रेल्वे स्थानकावर कोणतेही अनुचित प्रकार घडु नये व प्रवाशांना सुखरूप प्रवास करता यावा, या हेतुने ज्या प्रकारे विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन प्रवाशांना समोरे जावे लागते. त्याच प्रकारची सुरक्षा व्यवस्था येत्या आज २८ सप्टेंबर पासुन रेल्वेस्थानकावर सुरू करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने प्रवाशांना त्यांच्या सोयीच्या असलेल्या प्रवासी गाडीनुसार रेल्वे स्थानकावर ३० मिनिटे अगोदर येण्याच्या सुचना रेल्वे प्रबंधकांनी केली आहे. VO :- केंद्र शासनाच्या रेल्वे विभागाने देशातील महत्वपुर्ण व अधिक प्रवासी तसेच आवागमन तसेच अधिक महसुल देणारे रेल्वे स्थानकांना ‘अ’ श्रेणीचा दर्जा देत आहेत. त्या अनुषंगाने गोंदिया रेल्वेस्थानकालाही हा दर्जा मिळाला आहे. विशेष म्हणजे गोंदिया जंक्शनही आहे. गोंदियावरून लगतच्या मध्यप्रदेश राज्यातही बालाघाट जिल्ह्यासह बरौनीपर्यंत रेल्वे प्रवास करता येतो. याशिवाय आंधप्रदेश व तेलंगणा राज्याला जोडणारी बल्लारशा रेल्वे मार्ग आहे. यामुळे या रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे मोठे आवागमन असते. विदर्भातील नागपुरनंतर सर्वाधिक उत्पन्न देणारे गोंदिया हे रेल्वेस्थानक ठरले आहे. त्या अनुषंगाने रेल्वेस्थानकाला ‘अ’ श्रेणीचा दर्जा देण्यात आला आहे. हा दर्जा प्राप्त झाल्याने रेल्वेस्थानकाला सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन भक्कम करण्याचा प्रयत्न रेल्वे विभागाने सुरू केला आहे. त्या अनुषंगानेच ज्या प्रकारे विमानतळावर प्रवाश्यांची सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करून व आत व बाहेर येजा करण्यासाठी एक मुख्य द्वारा सुरु ठेवला आहे. तसेच आज २८ सप्टेंबरपासुन गोंदिया रेल्वे स्थानकावर होणार आहे. एकंदरीत ‘अ’ श्रेणीचा दर्जा मिळाल्याने रेल्वे विभागाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यत आली असुन बाकी द्वार बंद करण्यात आले आहे.  
VO :- गोंदिया रेल्वेस्थानकाच्या पश्चिम दिशेला मालधक्का व कुडावा लाईन [परिसर  दोन्ही बाजूला फुट ओवरब्रिज आहे. मात्र, रेल्वे विभागाने यावरून आवागमन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, रेलटोली परिसरातील बुकिंग कार्यालय व प्लॅटफार्म क्र. १ वरच आवागमन करता येणार आहे. रेल्वेस्थानकाच्या पश्चिम भागात राहणा-या नागरिकांना याचा त्रास होणार असुन प्रवाशांना प्लॅटफार्म क्र. ४, ५, व ६ वर जाण्याकरीता मोठे अंतर कापावे लागणार आहे. फुट ओवरब्रिजसह रेल्वेस्थानकाच्या मध्यभागी असलेल्या पुलावरून आगमन व निकासी आज २८ सप्टेंबरपासुन बंद करण्यात आली आहे. रेल्वेस्थानकात प्रवासी व्यतीरिक्त इतर कुणालाही प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन हा निर्णय चांगला असला तरी याचा फेर विचार करून मालधक्का व कुडावा लाईन परिसरातील फुट ओवरब्रिज सुरू ठेवावा, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
 BYTE :- नंदु बहादुर (पुलिस निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल) 
BYTE :- अनिल डोडानी (प्रवासी)
BYTE :- युवराज अग्रवाल (प्रवासी, बैग लटकविलेला आहे)Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.