गोंदिया- 'सीड बँकेतील' बियांचा वापर करून चिमुकल्या हातांनी सुमारे ५० प्रजातीच्या बिंयाचे संकलन करून शेकडो पर्यावरणपुरक राख्या तयार केल्या आहेत. या माध्यमातून प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला. शाळेतील मुलींनी देखील मुलांना या पर्यावरण पूरक राख्या बांधून राक्षाबंधन सण साजरा केला. गोंदिया पब्लिक शाळेमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला.
गोंदिया पब्लिक शाळेमधील राष्ट्रीय हरित सेनेच्यावतीने या वर्षी एका अभिनव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी 'सीड बँक' तयार केली होती. या सीड बैंक मध्ये सुमारे ५० प्रजातीचे बियाने संकलन करण्यात आले. त्याच बियांच्या शेकडो राखी ही तयार करण्यात आल्या. रक्षाबंधण हा सण समोर असताने हा उपक्रम राबविण्यात आला.
बहीणीने आपल्या भावाला बांधलेली राखी निघाल्यानंतर किंवा कुठेही पडल्या गेली असता, त्या राख्यांमध्ये वापरलेले प्लास्टिक व रसायन यामुळे पर्यावरण काही प्रमाणात तरी प्रदुषित होते. हिच बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय हरित सेनेला यावर्षी पर्यावरण पूरक राखी तयार करण्याची संकल्पना सुचली व त्यांनी बियांपासुन राखी तयार करण्याचे ठरविले. यासाठी विद्यार्थ्यांना बियांपासून राखी तयार करण्याचे प्रशिक्षण ही चिमुकल्यांना दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध प्रजातींच्या बियांचा वापर करत पर्यावरण पूरक शेकडो राख्या तयार केल्या. यासाठी फक्त लोकर व रंगीत पेपरचा वापर करण्यात आला असुन पर्यावरणाला काहीच धोखा होणार नाही.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या पर्यावरण पुरक राख्यांचा उपयोग शाळेतच राखीचा सण साजरा करण्यासाठी करण्यात आला. शाळेतील मुलींनी शाळेतील मुलांना ओवाळणी करत मुलांच्या हातावर या पर्यावरण पुरक बियाणांपासुन तयार करण्यात आलेल्या राख्या बांधून शाळेतच राखी सण साजरा केला.
शासनाच्या विविध योजनांचा होणार प्रसार
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या राख्यांतील बियांची लागवड करून शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेला हातभार लावता येणार आहे. शिवाय या राख्या पर्यावरण पुरक असतानाच यातून शासनाच्या विविध योजनांचा संदेश दिला जात आहे. विद्यार्थ्यांनी बेटी बचाओ, वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धन स्वतंत्र्यता दिवस इको फ्रेंडली गणपती आदी विविध योजनांवर आधारित संदेश देण्याऱ्या राख्या तयार केल्या आहेत. बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेली ही पर्यावरण पुरक राखी हातातून निघाल्यानंतर ही एक वृक्षाच्या रूपांतून बहिणीच्या प्रेमाची सदैव साक्ष देणारी ठरणार आहे