गोंदिया - जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटीयाडोह धरण जलाशय मंगळवारी पूर्ण क्षमतेने भरले आहे. सहा वर्षांनंतर धरणाच्या भिंतीवरून पाणी वाहत असल्याचे पाहून नागरिकही सुखावले आहे. मंगळवारी गोंदिया जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ.परिणय फुके हे धरणातील जलाशयाचे जलपुजन करणार आहेत.
हेही वाचा... नक्षलग्रस्त गोंदियात तान्हा पोळा उत्साहात; बाल-गोपाळांसाठी सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन
इटीयाडोह जलाशय हा तब्बल 6 वर्षानंतर पहिलांदाच ओव्हरफ्लो झाला आहे. सोमवारी रात्री पडलेल्या पावसाने व अर्जुनी-मोरगाव, देवरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने हा जलाशय भरला आहे. इटायाडोह जलाशय भरल्याने अनेक लोक या ठिकाणी धरण पाहायला येत आहेत. लोकांनी असुरक्षतेच्या ठिकाणी जात, अपघात होऊ नये यासाठी प्रशासनाने मागील दोन दिवसांपासून इथे पोलीस बंदोबस्त केला आहे. तसेच प्रवेशबंदीचे फलकही लावण्यात आले आहे.
हेही वाचा... गोंदियात मारबताचा उत्साह.. शहरातील मिरवणुकीत कलम ३७० हटविल्याचा आनंद
हेही वाचा... भाजप-सेनेचे सरकार हे शेतकऱ्यांचे नाही तर अदानी-अंबानींचे सरकार - नाना पटोले