ETV Bharat / state

गोंदियात अनेक दुकानांवर चालला बुलडोजर; नगर परिषदेची पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम - गोंदिया अतिक्रमण हटाव मोहीम

गोंदिया नगर परिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम ही शहरवासीयांसाठी एक चर्चेचा विषय झाला आहे. नगर परिषदेने आत्तापर्यंत एकही अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने राबविली नाही. सर्व मोहिमा अर्ध्यावरच बंद पडल्या. त्यातच नगर परिषदेने आज बुधवारपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली.

गोंदिया
गोंदिया
author img

By

Published : Dec 16, 2020, 7:07 PM IST

गोंदिया - नगर परिषदेने आज बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास दोन जेसीबी आणि तीन ट्रॅक्टरच्या मदतीने अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली. शहरातील फुलचूर नाक्यापासून जयस्तंभ चौक, नेहरू चौक, ते मरारटोली टी-पाईंटपर्यंत रस्त्यालगत अनेक व्यावसायिकांनी थाटलेल्या अतिक्रमित दुकानांवर बुलडोजर चालवून अतिक्रमण हटविले.

गोंदिया

गोंदिया नगर परिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम ही शहरवासीयांसाठी एक चर्चेचा विषय झाला आहे. नगर परिषदेने आत्तापर्यंत एकही अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने राबविली नाही. सर्व मोहिमा अर्ध्यावरच बंद पडल्या. त्यातच नगर परिषदेने आज बुधवारपासून पुन्हा अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली. जयस्तंभ परिसरातून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली. अनेक दुकानांसमोरील नालीवरील अतिक्रमण काढण्यात आल्याने रस्त्यालगत अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे रस्ता अरुंद झाला असून नाल्यादेखील हरविल्या आहेत. यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने थोडा जरी पाऊस झाल्यास शहरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते. त्यामुळे रस्ता आणि नाले मोकळे करण्यासाठी नगर परिषदेने अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. यासाठी अतिक्रमणधारकांना पूर्वीच नोटीस देण्यात आली होती. काही दुकानादारांनी रस्त्यापर्यंत पक्के बांधकाम केले होते. हे अतिक्रमण काढण्यात आले. तसेच नालीच्या खोदकामाला सुध्दा सुरुवात करण्यात आली.

मोहिमेला अनेकांचा विरोध

ही मोहीम नगर परिषद स्वच्छता विभाग, पोलीस विभाग, विद्युत विभागाने राबविली. विशेष म्हणजे नगर परिषदेने सुरू केलेल्या या कारवाईचा काही नगरसेवकांनी विरोध केल्याची माहिती आहे. त्यामुळे ही मोहीम सुध्दा अर्ध्यावरच बंद पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर काही दुकानदारांनी सुध्दा या नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे आमचे दुकान बंद करून नगर परिषदेला काय मिळणार आहे? असे सांगत या मोहिमेचा विरोध केला. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज शहरातील रस्त्यांची आणि अतिक्रमणाची समस्या स्थानिक लोकप्रतिनिधी सुध्दा माहिती आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी, अतिक्रमणातून रस्ते मुक्त करण्यासाठी त्यांनी सुध्दा पुढाकार घेण्याची गरज आहे. तर शहराचा विकास शक्य आहे.

रस्ते अतिक्रमण मुक्त होण्याची शक्यता कमीच शहरातील बाजारपेठेतील रस्ते व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे अधिकच अरुंद झाले आहे. यामुळे शहरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. हे अतिक्रमण काढून शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी नगर परिषदेने आतापर्यंत अनेकदा मोहीम राबविली. मात्र, या सर्व मोहीम अर्ध्यावरच बंद पडल्या. त्यातच शुक्रवारपासून सुरू झालेल्या अतिक्रमण हटाव मोहीमेला काही नगरसेवकांनी विरोध केल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही मोहीम सुध्दा अर्ध्यावरच बंद पडण्याची शक्यता आहे, का हे बघण्यासारखे असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.