गोंदिया - नगरपरिषद कार्यालयाची इमारत आता जीर्ण झाली असुन तिचे प्लास्टर पडण्याचा प्रकार सातत्याने घडत आहे. गोंदिया नगरपरिषदेत आता हा प्रकार नेहमीचाच झाल्याचे खुद्द कर्मचारीच सांगत आहे. त्यामुळे नगरपरिषदेची इमारत धोकादायक ठरत असुन परिणामी कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात असल्याचे दिसत आहे. सन १९८० च्या पूर्वीचे नगरपरिषद इमारतीचे बांधकाम असल्याचे माहिती मिळत आहे. म्हणजेच, इमारतीने चाळीशी पार केली असुन जीर्ण झाली आहे.
इमारतीचा बाहेरचा भाग अत्यंत जीर्ण असून आतमधील प्लास्टरही उखडत चालले आहे. असाच प्रकार आज १६ जुलै रोजी घडला. शिक्षण समिती सभापतीच्या दालनासमोरच छताचे प्लास्टर पडले. विशेष म्हणजे, मध्यंतरी टाऊन स्कुलमध्ये असलेल्या जन्म-मृत्यु नोंदणी विभागा तसेच असलेल्या विद्युत विभागाच्या खोलीचे ही प्लास्टर पडले होते. यामध्ये विभागातील स्कॅनर आणि संगणकाची तुटफूट झाली होती. आता हा प्रकार घडल्याने कर्मचाऱ्यांनाही भीती वाटू लागली आहे की, कधी हे प्लास्टर आपल्या अंगावर पडले तर धोखा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच प्रमाणे नगरपरिषद प्रशासन जेथे आवश्यक नाही, तिथे पैशांची नासाडी करते. मात्र गरजेच्या ठिकाणी पैसा खर्च करण्यात मात्र विचार करतात.
हेही वाचा - ४०० वर्षांचा वटवृक्ष वारकऱ्यांच्या आश्रयाचे ठिकाण, संवर्धनासाठी वृक्षप्रेमींचे चिपको आंदोलन
नगरपरिषद अध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच सर्वत्र सभापतीच्या दालनाचे सौंदर्यिकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सुमारे २ वर्षापासुन पाणी पुरवठा विभागाच्या सभापतींच्या दालनाचे पीओपी पडले होते. त्यानंतर निवडुन आलेल्या सभापतींनी आपआपल्या मर्जीने त्यांच्या दालनाचे काम करवुन घेतले. यामध्ये लाखो रूपयांचा खर्च नगर परिषद करत आहे. मात्र, कर्मचारी व सामान्य नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नगरपरिषद काम करण्याकडे दुर्लक्ष केला जात असल्याचे दिसत आहे.
काही वर्षापुर्वी नगरपरिषदेचे मालमत्ता कर विभाग असलेल्या जुन्या इमारतीचा एक भाग पडला होता. सुदैवाने यामध्ये कसलीही हानी झाली नाही. मात्र एखादी अप्रिय घटना घडण्याची वाट नगरपरिषद बघित आहे काय, असा सवाल पडत आहे. मात्र, आता आम्हालाही भीती वाटू लागली आहे, असे येथील कर्मचाऱ्यांनी बोलून आहेत.