गोंदिया - सध्या ऑस्ट्रेलिया येथे बिग टी- २० क्रिकेट सुरु आहे, या क्रिकेटवर जुगार/बेटिंग करत असल्याची माहिती गोंदिया शहर पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी गोंदिया येथील कचरा मोहल्ला येथे विकास भालाधरे याच्या घरी धाड टाकली. त्या ठिकाणी काही व्यक्ती त्यांचेकडील मोबाईल फोनच्या सहाय्याने ऑस्ट्रेलिया देशात सुरू असलेली big bash T-20 क्रिकेट सिरीजमधील ब्रिसबेन विरूध्द अॅडिलेट स्ट्रायकर या टी-२० क्रिकेट सामन्यावर (जुगार/बेटींग) घेत असल्याचे आढळून आले.
यामध्ये चार व्यक्ती हे भालाधरे यांच्या राहत्या घरी एका रूम मध्ये बसून big bash T-20 क्रिकेट सिरीज मधील ब्रिसबेन विरूध्द अॅडिलेट स्ट्रायकर या टी-२० क्रिकेट सामन्यावर आपल्या मोबाईलवर ऑनलाईन सट्टा खेळतांना आढळून आले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी ‘क्रिकेट माझा ११’ अॅप्सपर क्रिकेट बॅटींग बाबत लोकांकडून पैसे घेवून आकड्यांवर हारजितचा सट्टा खेळवित असल्याचे सांगितले. आरोपींमध्ये कपील हरपलदास जुडीयानी ३३ वर्ष, (रा. कवडी चौक पेट्रोलपंप जवळ नागपूर), जयकुमार किशोर मेघरानी (२६ वर्ष, रा. सिंधी कॉलोनी, खामला, नागपूर), अजय श्रीचंद चांदवानी २३ वर्ष, (रा. जरीपटका, नागपूर), गोयल अशोक दिपानी २१ वर्ष, (रा. गणेश मंदीर चौक, नागपूर) यांचा समावेश असून यांच्या कडून १५ मोबाईल, चार लॅपटॉप, एक टिव्ही संच, व इतर साहित्य असे एकूण १ लाख ६३ हजार १०५ रूपयाचा मुद्येमाल जप्त करण्यात आले. सर्व आरोपीं विरूध्द गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे अप.क्र. ७७४/२०२० कलम ४,५ मजुका गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोरील तपास शहर पोलीस करीत आहे.