गोंदिया- कोरोनामुळे जिल्ह्यात यंदा साध्यापद्धतीने नवरात्री साजरी केली जात आहे. दरवर्षी गोंदिया शहरातील रेलटोली भागातील अंबिका दुर्गा मडळ नवरात्रीत अनोखे उपक्रम घेत असते. ते पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. मात्र, यंदा मंडळाने देवीची प्रतिकृती असलेली रांगोळी बनवून ती सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे. गर्दी टाळण्यासाठी असे करण्यात आले असून मातेची रांगोळी नेटकऱ्यांना आकर्षित करत आहे.
नवीन पारख या कलाकाराने मातेची रांगोळी साकारली आहे. त्याने मंडळाच्या देवीला रांगोळीत उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. ही रांगोळी बनवायला त्याला ६ तास लागले. नागरिकांना या रांगोळीचे दर्शन करता यावे यासाठी मंडळाकडून ही रांगोळी समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अतिशय सुरेख बनवलेली ही रांगोळी सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधत आहे. मागील २० वर्षापासून अंबिका उत्सव मंडळ अशा पद्धतीचे अनोखे उपक्रम घेत आहे.
हेही वाचा- कोरोना बळीच्या मृतदेहावरील दागिने लंपास; पतीची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार