ETV Bharat / state

गोंदियात वीज अंगावर कोसळून तरुणीचा मृत्यू, चार गंभीर

शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवार) गोंदिया जिल्ह्यात घडली. तर, अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

girl died by lightning at gondia
गोंदियात वीज अंगावर कोसळून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू
author img

By

Published : Aug 2, 2020, 2:19 AM IST

गोंदिया - शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवार) गोंदिया जिल्ह्यात घडली. तर, अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्याच्या धामणगाव येथे ही घटना घडली.

गोंदिया जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून कुठेही पाऊस पडलेला नाही. मात्र, आज आमगाव तालुक्यात आठवड्याच्या विश्रांतीनंतर दुपारपासून विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यातच धामणगाव येथे एका शेतात काम करत असलेल्या महिलांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. यात २० वर्षीय पूजा पुरुषोत्तम राठोड हिचा जागीच मत्यू झाला आहे. तर, सुशीला उत्तमसिंग पवार (५५) उर्मिला भरतलाल ठाकरे (६०) शोभा संतोष मेश्राम (४०) आणि मृत मुलीची आई कांताबाई राठोड (४०) अशी जखमींची नावे आहेत. जखमींपैकी दोन महिलांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोन महिलांना गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचाराकरिता पाठवण्यात आले आहे.

गोंदियात वीज अंगावर कोसळून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू...

हेही वाचा - अयोध्येतील राम मंदिर एक हजार वर्षे टिकेल, भूकंपातही ठरणार अभेद्य

सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि नायब तहसीलदार, तलाठी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत मुलीच्या घरची परिस्थिती हलाखीची असून ती पॉलिटेक्निकच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. लॉकडाऊन काळात कॉलेज बंद असल्याने घरी थोडीफार मदत होईल, म्हणून ही मुलगी शेतात काम करत होती. परंतु, आजच्या या घटनेने गावावर एकच शोककळा पसरली आहे.

मृत मुलीचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविश्चेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर, आमगाव पोलिसांनी सदर घटनेची नोंद केली आहे. मृत मुलीच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांची केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.