ETV Bharat / state

धक्कादायक; गोंदियात आढळला कोरोनाचा रुग्ण, विदेशातून आलेल्या मित्राला भेटणे भोवले - माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. श्याम निमगडे

विदेशातून आलेल्या मित्राच्या संपर्कात आल्याने २३ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली. जिल्ह्यात २७ मार्चपर्यंत १२९ जण विदेशातून प्रवास करून आले असून त्यांच्या संपर्कात ६१३ व्यक्ती आल्याचे आढळले.

patient
कोरोना विशेष कक्ष
author img

By

Published : Mar 27, 2020, 1:30 PM IST

Updated : Mar 27, 2020, 2:29 PM IST

गोंदिया - विदेशातून आलेल्या मित्राच्या संपर्कात आल्याने २३ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली असून बाधित तरुणावर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यात 27 मार्चपर्यंत 129 जण विदेशातून प्रवास करून आले आहेत. या सर्वांच्या संपर्कात 613 व्यक्ती आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकीच हा 23 वर्षीय असून त्याचा मित्र विदेशातून आला होता. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्याच्या संपर्कात मित्र आल्याने, तो ही पाॅझिटिव्ह निघाला आहे. 742 व्यक्तीपैकी एकूण 740 व्यक्तींना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरण करून देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यापैकी 5 व्यक्तींचे वैद्यकीय तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या व्यक्तींची दररोज तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. श्याम निमगडे यांनी दिली आहे.

Last Updated : Mar 27, 2020, 2:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.