ETV Bharat / state

जानेवारी अखेर गोंदियावरून विमान सेवा सुरू होणार; फ्लाय बिगच्या अधिकाऱ्यांकडून विमानतळाची पाहणी - MP Sunil Mendhe on plan service

गोंदिया – इंदौर- हैद्राबाद ते चेन्नईकरिता केवळ दोन हजार रुपये तिकीट ( Airplane ticket rates from Gondia ) असणार आहे. विमानतळावरील आरक्षण खिडकी आणि इतर सुविधांची पूर्तता झाल्यास येत्या 26-30 जानेवारीपासून प्रवासी सेवा सुरू होणार असल्याची माहीती खासदार सुनिल मेंढे ( MP Sunil Mendhe on plan service ) यांनी दिली.

गोंदिया विमानतळ
गोंदिया विमानतळ
author img

By

Published : Jan 6, 2022, 8:02 PM IST

Updated : Jan 7, 2022, 2:01 PM IST

गोंदिया - शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिरसी विमानतळाचा जिर्णोद्धार होऊन 10 वर्षांचा काळ लोटला. यादरम्यान विमान वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. फ्लाय बिग एअरलाईन्स या कंपनीने उत्सुकता दाखविली आहे. चालू जानेवारी महिन्यातच शेवटपर्यंत प्रवासी वाहतूक सुरू होण्याची ( flights will start from Gondia ) शक्यता आहे.

बिरसी विमानतळाच्या ( Gondia Birsi Airport ) पुनर्बांधणीनंतर येथून प्रवासी उड्डाण सुरू करण्यात यावे, अशी मागणी गेल्या 10 वर्षांपांसून होत आहे. मात्र विविध अडचणी येत होत्या. फ्लाय बिग या प्रवासी विमान वाहतूक कंपनीने बिरसी विमानतळावरून सेवा सुरू करण्याची तयारी अंतिम टप्यात असल्याचे म्हटले आहे.

गोंदिया विमानतळाची माहिती देताना.

हेही वाचा-Warrant Against Raj Thackeray : राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी

याच महिन्यात विमान सेवा सुरू होण्याची शक्यता
गोंदियावरून इंदौर-बिरसी-हैदराबाद-चेन्नई अशी वाहतूक असणार आहे. कंपनीकडे चार एअरक्राफ्ट आहेत. तर 72 किंवा 80 आसनक्षमता असणारे विमान आठवड्यातून चार दिवस बिरसी विमानतळावरून सुटणार आहेत. येत्या काही दिवसांत दुसऱ्या टप्प्यात बिरसी विमानतळावरून विमानसेवांचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या इंदोर-बिरसी-हैदराबाद-चेन्नई विमानसेवा याच महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. त्याकरिता फ्लाय बिग कंपनीचे विभागीय प्रमुख रतन आंभोरे यांनी 4 जानेवारीला पाहणी करुन आढावा घेतला. येत्या काळात गोंदिया ते पुणे, गोवा, रायपूर-गोंदिया-पुणे-गोवा आदी मार्गांवरदेखील प्रवासी विमान ( Plan service from Gondia ) वाहतूक सुरू होण्याची शक्यता वर्तविली आहे.

हेही वाचा-Jawed Habib hair Spit Controversy Viral Video : हेअर स्टायलिस्ट जावेद हबीबने केस कापताना पाण्याऐवजी चक्क थुंकीचा वापर केल्याचा आरोप; पाहा व्हिडिओ

विमान कंपन्याच्या अधिकाऱ्यांनी घेतला आढावा
गोंदियाकरीता इंदोरवरुन सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी विमान निघणार आहे. हे विमान 8 वाजता गोंदियाला पोहोचेल. गोंदियावरुन हैद्राबादकरितादेखील विमान सेवा सुरू होणार आहे. दिव्यांग व वयोवृध्द प्रवाशांना व्हिलचेयरने नेण्याची व्यवस्था, प्रवासी कुठल्या गेटने आत येईल व बाहेर जाईल यांसदर्भातला आढावा कंपनीचे विभागीय प्रमुख रतन आंभोरे यांनी घेतला. तसेच तिकिट काऊंटरसह फ्लायबिग कंपनीचे कार्यालयाकरीता जागा कुठे असेल, याचाही आढावा खासदार सुनिल मेंढे, गजेंद्र फुंडे व बिरसी विमानतळाचे व्यवस्थापक बैजू यांच्यासोबत घेतला.

हेही वाचा-Bulli Bai App Case Twist : बुली बाई ॲप प्रकरणाला वेगळे वळण.. पोलिसांनी चुकीचे आरोपी धरले, ॲप मीच तयार केले.. ट्विटर युजरचा दावा

केवळ 2 हजार रुपयांचे विमान तिकीट
प्रवाशांची संख्या कमी असलेल्या विमानतळावरून प्रवाशांना कमी दरात (2000-2200 रुपये) विमान तिकीट ( Airplane ticket rates from Gondia ) उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारची उड्डाण नावाची योजना आहे. त्याचा लाभदेखील या विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे गोंदिया – इंदौर- हैद्राबाद ते चेन्नईकरिता केवळ दोन हजार रुपये तिकीट असणार आहे. विमानतळावरील आरक्षण खिडकी आणि इतर सुविधांची पूर्तता झाल्यास येत्या 26-30 जानेवारीपासून प्रवासी सेवा सुरू होणार असल्याची माहीती खासदार सुनिल मेंढे ( MP Sunil Mendhe on plan service ) यांनी दिली.

काही अडचणी सोडविण्याचे प्रयत्न सुरू-
बिरसी विमानतळावरुन हवाई सेवा सुरू करण्यासंदर्भातील तयारीचा आढावा घेण्यासाठी फ्लायबिग कंपनीचे अधिकारी 4 जानेवारीला आले होते. त्यांनी विमानतळाची पाहणी केली. तिकिट काऊंटर ठेवण्यापासून इतर लागणाऱ्या सोयींची पाहणी केली आहे. परत 20 जानेवारीला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहेत. त्यात पूर्ण आढावा घेतला जाणार आहे. शिल्लक अडचणी निकाली काढण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक के.व्ही. बैजू यांनी दिली.

विमानतळावरील सुरक्षा महाराष्ट्र पोलिसांच्या हाती
विमानतळावरुन प्रवासी वाहतुक सेवा सुरू झाल्यानंतर तेथील सुरक्षा व्यवस्थेसाठी सध्या सुरक्षेसाठी तैनात असलेले महाराष्ट्र पोलिसांचीच सेवा घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रवाशांच्या तपासणीपासून साहित्य स्क्रिनीगंपर्यतचे सर्व कार्य महाराष्ट्र पोलीस करणार आहेत.

Last Updated : Jan 7, 2022, 2:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.