ETV Bharat / state

गोंदिया : शेळ्या चोरी करणार्‍या पाच जणांच्या आंतरराज्यीय टोळीला अटक

गोंदिया पोलिसांच्या गुन्हे शाखेने शेळ्या चोरी करणार्‍या पाच जणांच्या आंतरराज्यीय टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 40 शेळ्या-बोकड जप्त केले आहेत. तर आरोपींना 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

five-member-gang-of-goat-thef-was-arrested-in-gondia
गोंदिया : शेळ्या चोरी करणार्‍या पाच जणांच्या आंतरराज्यीय टोळीला अटक
author img

By

Published : Feb 2, 2021, 10:47 AM IST

गोंदिया - जिल्ह्यात ठिकठिकाणी शेळ्या चोरी करणार्‍या पाच जणांच्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखेने अटक केली आहे. शहील शहादत हुसेन (21), उडिया मोहल्ला खुर्शिपार, मिथुनकुमार श्रीरामचरण सिंग (26),सोनू उर्फ राकेश ध्यानसिंह सरदार (21), गोलू उर्फ आमीर मुबारक हुसेन (35) व सलमान कुरेशी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. हे सर्व आरोपी छतीसगड राज्याच्या भिलाई येथील रहिवासी आहेत. तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरी गेलेले 2.90 लाख रुपये किंमतीचे 40 शेळ्या-बोकड जप्त केले आहेत. तर आरोपींना 2 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांची प्रतिक्रिया

आरोपींनी दिली 8 गुन्ह्यांची कबुली -

चौकशी दरम्यान या आरोपींनी 8 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.त्यात त्यांनी नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत 1, आमगाव 1, देवरी 2, सालेकसा 1, डुग्गीपार 1, अर्जुनी-मोरगाव ठाण्यांतर्गत 2 गुन्ह्यांचा समावेश आहे.

छोटा गोंदियाचे निघाले 3 शेळीचोर -

रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या बनाथर येथील रहिवासी मिलिंद भारत नागदेवे यांच्या 14 सप्टेंबर रोजी 1.20 लाख रुपये किंमतीच्या 30 शेळ्यांची चोरी झाली होती. 15 सप्टेंबर रोजी पोलिसांनी भादंविच्या कलम 380,34 अन्वये गुन्हा दाखल केला होता. यात छोटा गोंदियातील अमोल उमराव कोल्हटकर (29), स्वामी लीलाधर बाहे (32) व दुर्गेश उर्फ बाळू लीलाधार दाते (30) हे तीनही जण छोटा गोंदियाचे असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपींनी चोरी केलेल्या शेळ्याची विक्री केली असून मिळालेल्या रकमेतून 10 हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणात उपयोगात आणलेले 2.50 लाख रुपयांचे एक वाहन जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा - कुंभमेळ्यानिमित्त हरिद्वारमधील गायत्री परिवाराचे विशेष अभियान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.