ETV Bharat / state

लहान मुलांच्या भांडणावरून गोंदियात गोळीबार

गोंदिया शहरात लहान मुलाच्या भांडणावरुन झालेल्या वादातून तरुणाने गोळीबार केल्याची घटना घडली.

GONDIA
author img

By

Published : Feb 16, 2019, 10:04 AM IST

गोंदिया - शहरात लहान मुलाच्या भांडणावरुन झालेल्या वादातून तरुणाने गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला आहे. शहरातील दुर्गा चौक परिसरातील भालाधरे वाईन शॉपजवळ शुक्रवारी रात्री ८ ते ९ च्या सुमारास ही घटना घडली.

या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव शिव यादव (वय ४५, रा. सरकारी तलाव) आहे. जखमी शिव यादव यांच्या मुलाचे आरोपी नीरज गुरुदास वाधवानी (वय ४७) यांच्या मुलासोबत भांडण झाले होते. २ दिवसापूर्वी यामुळे शिव यादवने आरोपीच्या मुलाला चापट मारली होती. याबाबत मुलाने त्याच्या वडिलांना सांगितले. त्यावेळी आरोपी वाधवानींनी मनात राग धरून शिव यादववर गोळी झाडली. यामध्ये यादव यांच्या हाताला गोळी लागली.

यामध्ये यादव जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी वाधवानीला घेऊन त्याच्याकडील बंदूक जप्त केली आहे.

Intro:गेल्यावर्षी रेल्वेच्या एमयुटीपी 3 ए प्रकल्पाअंतर्गत 47 वातानुकुलीत लोकलची तरतूद करण्यात आली. या एसी लोकलच्या ऑर्डर देण्यात आल्या आहेत. लवकरच त्या मध्य व पश्चिम रेल्वेवर प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली.,

Body:जगातील काही मोजके देश आहेत ते अत्याधुनिक गाडी तयार करतात. आधी भारतात जे कोच बनत ते विदेशी टेक्नॉलॉजीयुक्त बनत. मात्र पहिल्यांदा भारतात मेकिंग इंडिया अंतर्गत सेमी हायस्पीड अशी वंदे भारत एक्सप्रेस तयार करण्यात आली.

Conclusion:पूर्वी भारतातील रेल्वे कारखान्यात कोच तयार होऊन कपलरने जोडले जायचे मात्र आता ही गाडी पुर्णतः एकसमान तयार करण्यात आलीय. यामुळे गाडीची सुरक्षा आणि वेग वाढेल. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल. जागतिक अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी ही एक्सप्रेस भारतीय प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल असे गोयल यांनी सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.