ETV Bharat / state

गोंदियातील शेतकरी अजुनही पीक विम्यापासून वंचित

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खैरी हे गाव साधारणतः १५०० च्या आसपास लोकसंखेचे गाव. या गावातील बहुतांश शेतकरी हे धानाची  शेती करतात तर काही शेतकऱ्यांकडे पाण्याचे साधन असले तरीही बहुतांश शेतकरी, हे कोरडवाहू असल्यामुळे पावसावर अवलंबून आहेत.

गोंदियातील शेतकरी अजुनही पीक विम्यापासून वंचित
author img

By

Published : Sep 21, 2019, 8:34 PM IST

गोंदिया - गावाच्या आणेवारीवरून त्या गावातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्याची योजना राज्य शासनाची आहे. मात्र ३३ टक्के आणेवारी असूनसुद्धा शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्याचा प्रकार जिल्ह्यातील खैरी या गावात उघडकीस आलेला आहे. तहसील कार्यालय तसेच स्थानिक जनप्रतिनिधींना ही बाब लक्षात आणून दिली. मात्र, केवळ आश्वासना शिवाय काही मिळाले नाही. त्यामुळे आतातरी पीक विम्याचा लाभ मिळणार काय ? याकडे शेतकऱ्याचे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा- सकाळपासून अनेकांचे फोन, काँग्रेसमध्ये येण्यास बरेचजण इच्छुक - बाळासाहेब थोरात

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खैरी हे गाव साधारणतः १५०० च्या आसपास लोकसंखेचे गाव. या गावातील बहुतांश शेतकरी हे धानाची शेती करतात तर काही शेतकऱ्याकडे पाण्याचे साधन असले तरीही बहुतांश शेतकरी, हे कोरडवाहू असल्यामुळे पावसावर अवलंबून आहेत. यंदा जिल्ह्यात पाऊस चांगला असला तरीही मागील दोन हंगामात या गावासह इतर भागात दुष्काळाची परिस्थिती होती. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरलेले धान उगविलेच नाही. तर येथील ४०० ते ५०० शेतकऱ्यांनी पीक विमा देखील काढला होता. या गावाची आणेवारी ३३ टक्के इतकी होती. त्यामुळे पीक विम्याचा लाभ येथील शेतकऱ्यांना मिळेल, अशी आशा होती. दुसऱ्या गावातील शेतकऱ्याला लाभ मिळत गेला मात्र अद्याप दोन महिने लोटून सुद्धा खैरी या गावातील शेतकरी आपल्या पीक विम्यापासून वंचित आहे.

गोंदियातील शेतकरी अजुनही पीक विम्यापासून वंचित

हेही वाचा- 'आचारसंहिता' म्हणजे नेमकं आहे तरी काय ?

खैरी या गावाची आणेवारी ३३ टक्के असून सुद्धा पीक विम्याचा लाभ मिळत नसल्यामुळे या बाबत येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय तसेच स्थानिक जनप्रतिनिधींना या बाबत विचारणा केली. मात्र आश्वासन शिवाय काही मिळालेले नाही. आता विधानसभा निवडणुका पाहता आचारसंहिता लागल्यामुळे या शेतकऱ्याचा प्रश्न निकाली काढणे आता तरी शक्य नाही. आज अस्मानी संकट पाहता शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. त्यातून त्याला बाहेर काढण्याकरिता राज्य शासनाने पीक विमा हे नवीन धोरण आखले असले तरीही त्याची योग्य प्रकारे अंबलबजावणी होत नसल्याचे उदाहरण या खैरी गावाला म्हटले तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे शासनाला जाग कधी येणार ? असा प्रश्न पडला आहे.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 21-09-2019
Feed By :- Reporter App 
District :- GONDIA 
File Name :- mh_gon_21.sep.19_vima story_720424  
 "३३ टक्के आणेवारी असुन सुद्धा"   
शेतकरी पीक विम्यापासून अजुनही वंचित    
Anchor :- " गावाचा आणेवारीवरून "  त्या  गावातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्याची योजना राज्य शासनाची आहे मात्र ३३ टक्के आणेवारी असून सुद्धा शेतकरी  पीक विम्यापासून वंचित असल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यातील खैरी या गावात उघडकीस आलेला आहे ,,,तहसील कार्यालय तसेच स्थानिक जनप्रतिनिधी ना हि बाब लक्षात आणून देऊन सुद्धा केवळ आश्वासन शिवाय काही मिळाले नाही त्यामुळे आतातरी पीक विम्याचा लाभ मिळणार काय याकडे येथील शेतकऱ्याचे लक्ष लागलेले आहे
.VO :- गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खैरी हे गाव साधारणतः १५०० शे चा आसपास लोकसंखेचे गाव या गावातील बहुतांश शेतकरी हे धानाची  शेती करतात तर काही शेतकऱ्याकडे पाण्याचे साधन असले तरीही बहुतांश शेतकरी, हे कोरडवाहू असल्यामुळे वरचा पावसावर ते अवलंबून आहे , यंदा जिल्ह्यात पाऊस चांगला असला तरीही मागील दोन हंगामात या गावासह इतर भागात दुष्काळ ग्रस्त परिस्थिती होती त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरलेले धान  उगविलेच नाही तर येथील ४०० ते ५०० शेतकऱ्यांनी पीक विमा देखील काढला होता तर स्थिती पाहता या गावाची आणेवारी हि ३३ टक्के इतकी होती त्यामुळे पीक विम्याचा लाभ येथील शेतकऱ्यांना मिळेल अशी आशा येथील शेतकऱ्यांना होती मात्र दुसऱ्या गावातील शेतकऱ्याला लाभ मिळत गेला मात्र अद्याप दोन महिने लोटून सुद्धा खैरी या गावातील शेतकरी आपल्या पीक विम्यापासून वंचित आहे.
BYTE :- रघुनाथ सिंगनजुडे (शेतकरी)
BYTE :- तुषार शेंडे (शेतकरी)
BYTE :- विश्वनाथ बांते (शेतकरी)
VO :- खैरी या गावाची आणेवारी ३३ टक्के असून सुद्धा पीक विम्याचा लाभ मिळत नसल्यामुळे या बाबत येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय तसेच स्थानिक जनप्रतिनिधी ना या बाबत विचारणा केली मात्र आश्वासन शिवाय काही मिळालेले नाही शिवाय , विधानसभा निवडणुका  पाहता आचारसहिता लागल्या मुळे या शेतकऱ्याचा प्रश्न  निकाली काढणे आता तरी शक्य नाही 
BYTE:- विजय रहांगडले  (भाजप आमदार)
VO:- आज अस्मानी संकट पाहता शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे त्यातून त्याला बाहेर काढण्याकरिता राज्य शासनाने पीक विमा हे नवीन धोरण आखले असले तरीही त्याची योग्य प्रकारे अंबलबजावणी होत नसल्याचे उदाहरण या खैरी गावाला म्हटले तर वावगं ठरणार नाही त्यामुळे शासनाला जाग कधी येणार असा प्रश्न पडला आहे. Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.