ETV Bharat / state

विहिरीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांचे विहिरीत बसून आंदोलन - gondia farmers news

गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्याच्या भजेपार गावातील शेतकऱ्यांनी धडक सिंचन विहीर योजने अंतर्गत विहिरीचे बांधकाम केले. मात्र, बांधकाम करून दोन वर्षे पूर्ण झाली तरी या विहिरीचे अनुदान प्राप्त न झाल्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. 30 ऑगस्ट) विहिरीत बसून आंदोलन केले.

म
author img

By

Published : Aug 30, 2021, 5:30 PM IST

गोंदिया - जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्याच्या भजेपार गावातील शेतकऱ्यांनी धडक सिंचन विहीर योजने अंतर्गत विहिरीचे बांधकाम केले. मात्र, बांधकाम करून दोन वर्षे पूर्ण झाली तरी या विहिरीचे अनुदान प्राप्त न झाल्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. 30 ऑगस्ट) विहिरीत बसून आंदोलन केले.

विहिरीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांचे विहिरीत बसून आंदोलन

सालेकसा तालुक्यात धडक सिंचन विहीर योजने अंतर्गत 134 लाभार्थ्यांनी विहिरीचे बांधकाम केले. काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून केले तर अनेक शेतकऱ्यांनी दागिने गहाण ठेवून तसेच कर्ज काढून विहिरीचे बांधकाम पूर्ण केले. ठेकेदारानेही शासनाकडून अनुदान लवकर मिळेल या उद्देशाने विहिरीचे बांधकाम पूर्ण केले. पण, गेल्या दोन वर्षांपासून शासनाने निधी उपलब्ध करुन दिला नसल्याने ठेकेदार, व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांकडे पैशासाठी तगादा लावाला. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी प्रहार संघनटनेमार्फत पाण्याने भरलेल्या विहिरीत बसून आंदोलन सुरू केले आहे.

लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार

लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी दिली आहे. अनुदान मिळाले नाही तर विहिरीतच जलसमाधी घेऊ, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

'हे' शेतकरी आंदोलनासाठी उतरले विहिरीत

छगन बहेकार, प्रल्हाद बहेकार, जागेश्वर ब्राम्हणकर, टायकराम ब्राम्हणकर या चार शेतकऱ्यांनी विहिरीत बसून आंदोलन करत आहेत.

हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.