गोंदिया - जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथील परत एका शेतकऱ्याचे धानाचे पुंजने (धान्याचे ढीग) जळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रतापगड येथील भोजराज लागडे यांच्या शेतातील चार एकरातील धानाची कापणी नुकतीच झाली असून धानाचे पुंजने शेतात ठेवले होते. मात्र, अचानक त्यांच्या धानाच्या पुंजनेला अज्ञाताने आग लावून धानाचे पुंजने जाळले. यात संपूर्ण धानाचे पंजे जळून धान खाक झाले असून लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
वर्षभराचे अन्नधान्य एका क्षणात नष्ट झाल्याने शेतकऱ्यावर उपासमारीचे संकट निर्माण झाले असून शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र, गोंदिया जिल्ह्यात अशा घटना घडत असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोंदिया जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धान कापणी झाली आहे. त्या धान पुंजाची मळणीचा हंगामही सुरू आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून त्याची मळणी करण्यासाठी शेतात धानाचे पुंजने तयार करून ठेवले आहे. शेतकरी, मजूर मळणी करणार होते.
यापूर्वी २७ नोव्हेंबरला चिचगड येथील ६ गावातील ४० हुन अधिक शेतकऱ्यांचे ८० धानाचे पुंजने अज्ञाताने जाळले होते. या घटनेचे पंचनामे सुरु असताना पुन्हा २९ नोव्हेंबर रोजी चिचगड पासून १२ कि. मी. अंतरावर असलेल्या कडीकसा या गावातील १३ शेतकऱ्यांचे पुंजने जाळण्यात आल्याची घटना घडली होती. मात्र, रविवारी रात्री पुन्हा अर्जुनी-मोरगावातील प्रताबगड येथील एका शेतकऱ्याचा शेतातील चार एकरातील शेतातील धानाचे पंजे जळण्याची घटना उघडकीस आली आहे.
हेही वाचा - गोंदियात धानाच्या गंजीला आग, लाखो रुपयांचे नुकसान; नुकसानभरपाईची मागणी