ETV Bharat / state

गोंदिया- छत्तीसगड सीमेवर चकमक.. सुरक्षा दलाकडून ७ नक्षलवाद्यांचा खात्मा

या चकमकीत ७ नक्षवादी ठार झाले आहेत. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. ही घटना आज (शनिवार) सकाळी छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यात घडली.

नक्षलवाद्यांचा खात्मा
author img

By

Published : Aug 3, 2019, 3:20 PM IST

Updated : Aug 3, 2019, 5:40 PM IST

गोंदिया - महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील बोरतलाव जंगल परिसरात सुरक्षा बल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ७ नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये ३ महिलांचा समावेश आहे. ही घटना आज (शनिवार) सकाळी छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातील बोरतलाव, शेरपार व सीतागोटा डोंगराळ परिसरात घडली. घटना स्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील चकमकीत ७ नक्षलवादी ठार झालेत

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यापासून १५ किलोमीटर अंतरावर चकमक घडलेले ठिकाण आहे. कारवाई दरम्यान ७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. नक्षलवाद्यांकडून एके - ४७ बंदुका, १२ बोअरच्या बंदुका तसेच इतर शस्त्रात्रे जप्त करण्यात आले. तसेच या चकमकीत सुरक्षा दलाचे ३ जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

हल्ला घडवल्यानंतर गोंदिया जिल्ह्यात नक्षलवादी सुरक्षित स्थळी येतात. त्यामुळे गोंदियाला नक्षलवाद्यांचे 'रेस्ट झोन' म्हणूनही ओळखले जाते. 'गोंदिया पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी' व जनवादी क्रांतीकारी माओवादी संघटनेच्यावतीने २८ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत शहीद नक्षल सप्ताह पाळला जातो. या सप्ताहा दरम्यान नक्षलवाद्यांकडून मोठ्या घातपाताच्या घटना घडविल्या जातात. त्यामुळे सुरक्षा दलांकडून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला जातो.

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 03-08-2019
Feed By :- Reporter App
District :- GONDIA
FILE NAME :- mh_gon_03.aug.19_naxal file sort_7204243
बोरतलाव सीमेवर ७ नक्षली ठार
शस्त्र साठा जप्त
Anchor :- महाराष्ट्र- छत्तीसगड राज्याच्या गोंदिया जिल्हा व राजनांदगाव जिल्हा च्या सीमेवरील बोरतलाव जंगल परिसरात सुरक्षा बल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली या घटनेत ७ नाक्षवादी ठार झाले हि चकमक आज सकाळ पासुन सुरु झाली असुन हि घटना छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातील बोरतलाव, शेरपार व सीता गोटा डोंगराळ परिसरात घडली. घटना स्थळावरून मोठ्या प्रमाणात शास्त्र साठा नक्षली सामुग्रि जप्त करण्यात आली.
VO :- गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्या पासून १५ किलोमीटर अंतरावर छत्तीसगड राज्यातील राजनांदगांव जिल्ह्यतील बोरतलाव जंगल परिसरातील शेरपार व सीतागोटा डोंगराड परिसरात सुरक्षाबल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली या चकमकीत प्रति उत्तर देताना सुरक्षा बलानी ७ नक्षलवाद्यांना ठार केले असुन ठार झालेल्या नाक्षवाद्यांकडून AK-47, 303 राइफल, 12 बोर बंदूक, सिंगल शाट रायफल सहित नक्षली सामुग्रि जप्त करण्यात आली तसेच या चकमकीत ३ सुरक्षा बला चे जवान जखमी झाले असल्याची माहिती आहे.
VO :- गोंदिया जिल्हा हा नक्षल ग्रस्त असुन मागील काही वर्षा पासुन मोठ्या नक्षली घटना घडल्या नाही गोंदिया पोलिसांना नक्षलांवर नियंत्रण ठेवणे यश आले आहे परंतु सीमावारी राज्यात व जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून घटना घडविल्या नंतर नक्षली सुरक्षित स्थान म्हूणन गोंदिया ला येतात म्हूणन गोंदिया ला नाक्षवाद्यांचे रेस्ट झोन म्हणुन ओळखले जाते. तसेच गोंदिया पीपल्स लुबारीकेशन गुरिला आर्मी व जनवादी क्रन्तिकारी माओवादी संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा २८ जुलै ते ३ ऑगस्ट पर्यंत शहीद नक्षल सप्ताह पाळल्या जातो या सप्ताह दरम्यान नक्षलवाद्यांकडून मोठ्या घातपाताचा घटना घडविल्या जातात या बाबीला गंबीरते ने घेऊन सुरक्षा बल या सप्ताह मध्ये जंगल मध्ये सर्च ऑपरेशन ची मोहीम राबविण्यात येते याच सर्च ऑपरेशन दरम्यान आज ७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा बला ला यश आले आहे. Body:VO :- Conclusion:
Last Updated : Aug 3, 2019, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.