ETV Bharat / state

गोंदियातील 'एक दिन सायकल के नाम' मोहीम पुन्हा सुरू

कोविड-१९ चा संसर्ग झाल्यामुळे या मोहिमेला ब्रेक लागला. मार्च २०२० पासून ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ही मोहीम थांबविण्यात आली होती. मात्र, टाळेबंदी उठल्यानंतर कोरोनाचे नियम पाळत पुन्हा ही मोहीम नवीन वर्षाच्या पहिल्या रविवार म्हणजेच ३ जानेवारी २०२१ पासून 'एक दिन सायकल के नाम'ला सुरुवात करण्यात आली आहे.

गोंदिया
गोंदिया
author img

By

Published : Jan 3, 2021, 4:21 PM IST

गोंदिया - शहरातील युवकांनी 'एक दिन सायकल के नाम' हा उपक्रम १८ जून २०१७ ला सुरू केला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश आठवड्यात एक दिवस सायकल चालवावी आणि पर्यावरण, आरोग्य चांगले रहावे असा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दर रविवारी सायकल चालवत संदेश देण्याची अभिनव मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमे दरम्यान १४५ रविवार पूर्ण करण्यात आले. एवढेच नव्हे तर या ग्रुपचे दोन युवक पर्यावरण व आरोग्याचे संदेश घेऊन गोंदिया ते जम्मू काश्मीर व्हाया बाघा सीमेपर्यंत सायकलने पोहचले.

गोंदिया

कोविड-१९ चा संसर्ग झाल्यामुळे या मोहिमेला ब्रेक लागला. मार्च २०२० पासून ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ही मोहीम थांबविण्यात आली होती. मात्र, टाळेबंदी उठल्यानंतर कोरोनाचे नियम पाळत पुन्हा ही मोहीम नवीन वर्षाच्या पहिल्या रविवार म्हणजेच ३ जानेवारी २०२१ पासून 'एक दिन सायकल के नाम'ला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील अनेक युवकांनी भाग घेऊन पर्यावरणाचा संदेश पोहचविण्याचा मानस घेतला आहे.

सायकलमुळे आरोग्य चांगले राहते

गोंदिया येथील जेसीआई राईस सिटी गोंदिया आणि आज फोरमच्या एकत्रित प्रयत्नातून १८ जून २०१७ पासून एक दिन सायकल के नाम असा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी सायकल चालवणे असा आहे. याचा मुख्य उद्धेश असा आहे कि, सायकलपासून आरोग्य चांगले राहते. तसेच पेट्रोल, डिझेलच्या खर्चापासून बचाव होऊन पर्यावरणाचे संरक्षण होते. प्रत्येक रविवारी २० ते २५ किलोमीटर अंतराचा प्रवास सायकलने केला जातो.

जम्मू व बाघा सीमेपर्यंत सायकल प्रवास

या उपक्रमात युवक-युवतींपासून ते ७० वर्षांच्या वृद्धांपर्यंत लोक सहभागी होत असतात. १८ जून २०१७ पासून मार्च २०२० पर्यंत असे एकूण १४५ रविवारपर्यंत हजारो किलोमीटरचा प्रवास सायकलच्या माध्यमातून केला गेला आहे. अमन व शांती तसेच पर्यावरणाचा संदेश घेऊन या ग्रुपमधील अशोक मेश्राम व भारत चंद्रबघेले हे दोन युवक हजारो किलोमीटरचा सायकल प्रवास करून जम्मू व बाघा सीमेपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. ही मोहीम निरंतर सुरू असतानाच देशात कोरोचा शिरकाव आला व शासनाने मार्च महिनाखेरपासून टाळेबंदी सुरू केली. शासनाच्या नियम व अटींचे पालन करत मार्च २०२० पासून ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत या मोहिमेला ब्रेक लावण्यात आला. मात्र, शासनाच्या नियम आणि अटीचे पालन करत पुन्हा नवीन वर्षापासून एक दिन सायकल के नाम या मोहिमेला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.