ETV Bharat / state

कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी मृत कोंबाड्या फेकल्या नाल्यात, दूषित झालेल्या पाण्यामुळे विदेशी पक्षांचाही मृत्यू - कोरोना व्हायरसची भीती

कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी जिल्ह्यातील पिंडकेपार येथील राजा-रानी नाल्यात एका अज्ञात व्यक्तीने चक्क प्लास्टिकच्या पोत्यामध्ये मृत कोंबड्या भरून फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकराने पाणी दूषित झाले असून नाल्यात दुर्गंधी पसरली आहे. या नाल्यात कटंगी जलाशयाचे पाणी येते ज्याला शेतकरी आपल्या शेतात वापरतात. एवढेच नव्हे तर, हे दुषित पाणी जलस्रोतांच्या माध्यमातून परिसरातील विहिरी आणि इतर ठिकाणी संग्रहित होते. त्यामुळे, आरोग्य धोक्यात येणार असल्याची भीती अनेकांच्या मनात घर करून बसली आहे.

कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी मृत कोंबाड्या फेकल्या नाल्यात

author img

By

Published : Mar 3, 2020, 1:45 AM IST

गोंदिया - चीनमधील कोरोना व्हायरसची दहशत जगभरात पसरली आहे. याच व्हायरसच्या भीतिपोटी जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील एका अज्ञात व्यक्तीने कोंबड्यांना पोत्यात भरून चक्क नाल्यात फेकून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामुळे पिंडकेपार परिसरातील राजा-रानी नाल्यातील पाणी हे मृत कोंबड्यामुळे दूषित झाले आहे. तर, या पाण्यामुळे विदेशी पक्षांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींनी रोष व्यक्त केला आहे. गोरेगाव तालुक्यातील नागरिकांचे आरोग्यही यामुळे धोक्यात आले असल्याचे गावकरी म्हणत आहेत. यामुळे ज्या अज्ञात व्यक्तीने नाल्यात कोंबड्या फेकल्या त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकरी करीत आहे. दुसरीकडे कोरोना व्हायरसच्या भीतीने या परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.

कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी मृत कोंबाड्या फेकल्या नाल्यात

चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतीय नागरिकांच्या मनातही घर करत आहेत. या व्हायरसबाबत अनेक अफवांना उधाण आले आहे. चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरसची लागण होईल अशी अफवा नागरिकांत पसरली आहे. त्यामुळे चिकन विक्रीतही घट झाली आहे. चिकन खाण्यापासून लोक दूर जात असल्याचे दिसत आहे. याच भीतीपोटी जिल्ह्यातील पिंडकेपार येथील राजा-रानी नाल्यात एका अज्ञात व्यक्तीने चक्क प्लास्टिकच्या पोत्यामध्ये मृत कोंबड्या भरून फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकराने पाणी दूषित झाले असून नाल्यात दुर्गंधी पसरली आहे. या नाल्यात कटंगी जलाशयाचे पाणी येते ज्याला शेतकरी आपल्या शेतात वापरतात. एवढेच नव्हे तर, हे दुषित पाणी जलस्रोतांच्या माध्यमातून परिसरातील विहिरी आणि इतर ठिकाणी संग्रहित होते. त्यामुळे, आरोग्य धोक्यात येणार असल्याची भीती अनेकांच्या मनात घर करून बसली आहे.

हेही वाचा - गोंदियात बनावट देशी दारू जप्त

दूषित पाण्याचा फटका माणसांसह पक्षांनाही बसला असून या नाल्यातील पाणी पिल्याणे काही विदेशी पक्षांचाही मृत्यू झाला आहे. याबाबत नागरिकांनी आरोग्य विभागाकडे तक्रार केली. सोबतच नाल्यात कोंबड्या फेकणाऱ्यावरही कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. मात्र, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. आरोग्य विभागाने कोरोनाविषयी जनजागृती करून नागरिकांच्या मनातील भीती काढणे आवश्यक आहे.

कोंबड्यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याची अफवा पसरल्याने सध्या खवय्यांनी चिकन खाणेच सोडून दिले आहे. त्यामुळे, कोंबड्यांच्या दरात अचानक घसरण झाली असून पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे. जिल्ह्यात दीड हजार पोल्ट्रीचालक असून उत्पादनाच्या तुलनेत मागणीत झालेली घट पाहता व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.

हेही वाचा - गोंदियात पावसासह गारपिटीचा अंदाज, शेतकरी चिंताग्रस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.