गोंदिया - जिल्ह्याच्या आमगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ठाणा या गावातील ३० वर्षीय दीपाली मेहर या महिलेने काल १६ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ४ महिन्या आधीच धर्मेंद्र मेहर आणि दीपाली यांचा गंधर्व विवाह झाला होता. मात्र, दीपालीची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हेही वाचा - Ek Din Cycle Ke Nam : युवकांनी केला गोंदिया ते छत्तीसगढ 'असा' सायकलप्रवास
पोलिसांनी या घटनेला कारणीभूत असलेला पती धर्मेंद्र मेहर आणि दीपालीची जाऊबाई प्रीती मेहर या दोघांना अटक केली आहे. प्राध्यापक धर्मेंद्र मेहर याच्या पहिल्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झल्याने त्याने ४ महिन्या आधी दीपाली गिरीपुंजे या महिलेशी लग्न केले होते. मात्र, पत्नीच्या मृत्यू नंतर धर्मेद्र आणि त्याची वहिनी प्रीती मेहर यांच्यात असलेले अनैतिक संबंध दीपालीला माहित झाल्यावर त्यातून होणारा मानसिक त्रास पाहता दीपालीने आपल्या घरच्या मंडळीला याची माहिती दिली होती. ती माहेरी तुमसर गेली होती. मात्र, ४ दिवसाआधीच धर्मेद्र हा तिची समजूत घालत घरी देव पूजा असल्याने तिला माहेरून ठाणा गावात आपल्या घरी आला. येथे दोघांमध्ये पुन्हा भांडण होत असल्याचे दिपालीने आपल्या माहेरी सांगितले होते. मात्र, घरच्या मंडळीने दीपालीला फोनवर धीर दिला. मात्र दीपालीला राग अनावर न झाल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले व आत्म्हत्या केली असल्याचे बोलले जात असून, तिच्या कुटुंबीयांनी मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे.
तर या संदर्भात पोलिसांनी तपास चक्रे फिरविली असता मृत दिपालीच्या कुटुंबीयांकडून नोंदविलेल्या बयाणातून पोलिसांनी प्राध्यापक धर्मेंद्र सदाराम मेहर (४२ वर्ष) आणि त्यांची वहिनी प्रीती जितेंद्रकुमार मेहर (३८ वर्ष) यांना अटक केली आहे. गुन्हा नंबर ५२/२०२० आयपीसी ३०६ आणि ३४ प्रमाणे पुढील तपास आमगाव पोलीस करत आहे.