गोंदिया - अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील अतिदुर्गम किशोरी या गावत श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. राधाकृष्ण कॉन्वेंटमधील चिमुकले राधा-कृष्णाच्या वेषात शाळेमध्ये आले होते. तसेच यावेळी मुलांनी दहीहंडीही फोडली. चिमुकल्यांचे पाल्य आणि शिक्षकांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.
शहरात दहीहंडीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे. हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात सहभागी होणाऱ्या तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो. तरुणांची अनेक मंडळे एकापाठोपाठ एक असा दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. यावेळी गोविंदा आला रेच्या घोषणांनी आजूबाजूचा परिसर दुमदुमून जातो.