गोंदिया - जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे धानपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जे काही थोडे फार धानपीक वाचले तेही तुडतुडा रोगाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील शेतकरी धानपिकाला आग लावत आहे.
पूर्व विदर्भात धानपिकाची सर्वात जास्त लागवड ही गोंदिया जिल्ह्यात केली जाते. या वर्षी कोरोनामुळे शेतकरी आधीच संकटात सापडला होता. त्यात परतीच्या पवासाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आणि आता मावा, तुडतुडा रोगामुळे थोडेफार हाथी येणारे पीकही नष्ट झाले आहे. पेरणी, रोवणी, खते, बियाणे याला एकरी २० हजार रुपये खर्च येतो. मात्र, पीक नष्ट झाल्याने हा खर्चही निघेल की नाही, याची शाश्वती नाही. तसेच, जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे, विवंचनेत असलेला शेतकरी धानपिकांना आग लावत आहे. शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.
हेही वाचा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी