ETV Bharat / state

गोरेगाव तालुक्यातील चिचगाव येथे शॉटसर्किटने लागली गोठ्याला आग

author img

By

Published : Mar 23, 2021, 5:20 PM IST

ही घटना काल रात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यानची आहे. या घटनेत दोन शेळ्यांचा मृत्यू झाला असून शेती उपयोगी साहित्यासह मोठे नुकसान झाले आहे. आगीला आटोक्यात आण्यात यश आल्याने मोठी घटना टळली.

गोंदिया
गोंदिया

गोंदिया - गोरेगाव तालुक्यातील चिचगाव येथे शॉटसर्किटमुळे दोन शेतकऱ्यांचे गोठे जळून खाक झाले. ही घटना काल रात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यानची आहे. या घटनेत दोन शेळ्यांचा मृत्यू झाला असून शेती उपयोगी साहित्यासह मोठे नुकसान झाले आहे. आगीला आटोक्यात आण्यात यश आल्याने मोठी घटना टळली.

गोरेगाव तालुक्यातील चिचगाव येथे रात्री १ वाजेच्या सुमारास अचानक गोठ्यात आगीचा भडका दिसून आला. यामुळे रात्री एकच तारांबळ उडाली. दरम्यान गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीला आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोठ्यात तनस असल्याने आगीने चांगलाच भडका घेतला होता. दरम्यान, अग्नीशामक पथकाला पाचारण करण्यासाठी अनेकांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवळपास दीड तास गोंदिया नगर परिषद व गोरेगाव पोलीस ठाण्याशी संपर्क झाला नाही. यामुळे घराला घर लागून असल्याने आग वाढू नये, यासाठी गावक-यांनी प्रयत्न केले. जवळपास दीड ते दोन तासानंतर गोंदिया नगर परिषदेची अग्नीशामक पथक दाखल झाले. तोपर्यंत शेतकरी माधव रहांगडाले व हिवराज रहांगडाले यांच्या मालकीचे गोठे जळून खाक झाले होते. गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. इतर जनावरे आगीमुळे जखमी झाली. त्याच प्रमाणे गोठ्यात ठेवलेली शेतीपयोगी सर्व साहित्य जळून खाक झाले. तसेच जवळपास १५० बोरी सिमेंट देखील पाण्यात वाहून गेले. एकंदरीत या घटनेत दोन्ही शेतकऱ्यांचे १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद महसूल विभागाने केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.