ETV Bharat / state

तोतया सीआयडीकडून लाखो रुपयांचा गंडा, पोलिसांमध्ये तक्रार दाखल - गोंदिया पोलीस

चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोलिसांकडून चोरट्यांवर वेळोवळी कारवाई करण्यात येते. मात्र चोर दरवेळी नवीन युक्ती शोधून पोलिसांना आव्हान देत असल्याचे पहायला मिळत आहे. दोन चोरट्यांनी आपण सीआयडीमधून आलो असल्याचे सांगत लाखो रुपयांना गंडा घातल्याची घटना हिंगोलीमध्ये घडली आहे.

Gondia crime news
तोतया सीआयडीकडून लाखोंचा गंडा
author img

By

Published : Oct 23, 2020, 6:30 PM IST

गोंदिया - शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोलिसांकडून चोरट्यांवर वेळोवळी कारवाई करण्यात येते. मात्र चोर दरवेळी नवीन युक्ती शोधून पोलिसांना आव्हान देत असल्याचे पहायला मिळत आहे. अशीच एक घटना गोंदियामध्ये घडली आहे. दोन चोरट्यांनी आपण सीआयडीमधून आलो असल्याचे सांगत लाखो रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तोतया सीआयडींचा लाखो रुपयांना गंडा

तक्रारदार धनसिंह कोचे हे बाजारातून घरी जात होते. यावेळी फुलचुर मार्गावरील रिलायंस पेट्रोलपंपाजवळ दोन जणांकडून त्यांना थांबवण्यात आले. या चोरट्यांनी आपण सीआयडीमधून आल्याचे सांगितले. शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, तपासणी सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. नंतर त्यांनी गाडीची डिकी उघडण्यास सांगितले. तुमच्या अंगावरील सर्व दागिने काढून डिकीमध्ये ठेवा, असं त्यांना सांगितले. त्यांनी त्याप्रमाणे केले, मात्र थोडे पुढे गेल्यावर त्यांनी चेक केले असता डिकीमध्ये केवळ मोबाईल आढळला, दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.