गोंदिया - कोरोना विषाणूपासून बचावासाठी शासनाने प्रतिबंधक उपाय योजना आखल्या असून, जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना ३१ मार्च पर्यंत सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील शाळांना सुट्ट्या घोषित करण्यात आलेल्या नाहीत. देवरी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्यावतीने कोरोना रोगाविषयी चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी 'कोरोना जनजागृती' हा उपक्रम राबावून विद्यार्थ्यांसह नागरिकांना कोरोनाला घाबरू नका, पण काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
हेही वाचा - CORONA : तर घरातच विलगिकरण करण्यात आलेल्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांची मदत
कोरोनाच्या भीतीने जगभर थैमान घातले आहे. राज्यशासनाने शहरी भागातील सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागातील शाळा सुरूच आहेत. तेव्हा कोरोनाबाबद विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी नक्षलग्रस्त देवरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमध्ये उपक्रम रबवण्यात आला. ग्रामीण भागात या रोगाची काळजी घेतली नाही तर, आजार पसरण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे शाळांमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांची खूप काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी कोरोना जनजागृती नावाचा भन्नाट उपक्रम भागी आणि देवरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबविण्यात आले.