ETV Bharat / state

महागाईविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा; महिलांनी रस्त्यावर स्वयंपाक करून नोंदवला मोदी सरकारचा निषेध

काँग्रेसच्या या मोर्चामध्ये महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तसेच घरगुती सिलिंडरचे गगनाला भिडलेले भाव, खाद्य तेलाच्या भडकलेल्या किमती यावरून महिला आंदोलकांनी उपविभागणीय कार्यलयासमोरच चूलीवर स्वयंपाक करत मोदी सरकारचा निषेध केला.

महागाईविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा
महागाईविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा
author img

By

Published : Jul 14, 2021, 7:12 AM IST

Updated : Jul 14, 2021, 7:47 AM IST

गोंदिया - देशात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जीवन जगने कठीण झाले आहे. गोरगरीब जनता काय खाणार आणि कसे प्रपंच चालविणार, असे प्रश्न जनतेतून उपस्थित केले जात आहेत. सर्वसामान्य जनतेच्या या समस्यांना घेऊन वाढत्या महागाई विरुद्ध केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी गोंदिया येथे जिल्हा काँग्रेसच्या वतीने गोंदिया उपविभागीय कार्यालयावर मंगळवारी सायकल मोर्चा काढण्यात आला. तसेच महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर स्वयंपाक करत सरकारचा निषेध नोंदवला.

महागाईविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा
महागाईविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा

इंधनाचे दर वाढतच चालल्याने त्याचा परिणाम जीवनाश्यक वस्तूंच्या दरावर होत आहे. महागाईने उच्चाक गाठल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. खाद्य तेलासह इतर वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे घराचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली असल्याने काँग्रेसच्या वतीने वाढत्या महागाईच्या मुद्‌यावरून केंद्र सरकारच्या निषेधार्थ हा सायकल मोर्चा काढण्यातच आला.

महागाईविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा;

काँग्रेसच्या या मोर्चामध्ये महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तसेच घरगुती सिलिंडरचे गगनाला भिडलेले भाव, खाद्य तेलाच्या भडकलेल्या किमती यावरून महिला आंदोलकांनी उपविभागणीय कार्यलयासमोरच चूलीवर स्वयंपाक करत मोदी सरकारचा निषेध केला.

महागाई नियंत्रणात आणण्याची मागणी-

यावेळी आंदोलकांच्या वतीने महागाईविरुद्ध केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करून प्रधानमंत्री यांच्या नावे उपविभागीय अधिकारी यांना महागाई नियंत्रणात आणण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी केंद्र सरकारने देशात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, खाद्य तेल, रासायनिक खत अश्या अनेक वस्तूंच्या किंमती देशपातळीवर वाढविल्या आहेत. त्या किंमती सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरुण यांना परवडणार्‍या नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारच्या महागाई विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून याचा निषेध करण्यात येत आहे. तसेच पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी करणे, घरगुती गॅसची किंमत कमी करणे, खाद्य तेल व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी करणे, शेतीकरिता लागणार्‍या खतांच्या किंमती कमी करणे, बेरोजगार तरुणांना रोजगार व नोकर्‍या देणे आदि मागण्यां या निवेदनातून करण्यात आल्या.

महागाईविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा
महागाईविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा

हा मोर्चा शहरातील गांधी प्रतिमा, जैन कुशल भवन, नवीन गंज बाजार, चांदणी चौक, भवानी चौक, इसरका मार्केट, विकास मेडिकल, शनी मंदिर नेहरू चौक हनुमान मंदिर सिव्हिलाईन, वाजपेयी ड्रायविंग स्कुल, मनोहर चौक, जयस्थंभ चौक, आंबेडकर चौक व उपविभागीय अधिकारी कार्यालय असे करत शहरात सायकल मोर्चा काढण्यात आले. या मोर्च्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

Last Updated : Jul 14, 2021, 7:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.