गोंदिया - केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल केले आहेत. केंद्राच्या निर्देशाप्रमाणे ग्रीन झोन असलेल्या गोंदियात आजपासून दारू विक्री सुरु करण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात मागील २८ दिवसात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी आजपासून दारू विक्रीला परवानगी दिली आहे.
हेही वाचा... कांदा खरेदीची मर्यादा ५० हजार टनांपर्यंत वाढवा ! अजित पवारांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र
ग्रीन झोन गोंदियात आजपासून मद्य विक्री सुरु करण्यात आली आहेत. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ही दारू दुकाने सुरु राहतील. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करत दुकानदारांनी दुकानांसमोर बॅरिगेट लावले होते. तसेच दुकानात आलेल्या प्रत्येक ग्राहकाला हात धुणे अनिवार्य करण्यात आले. त्यासोबत प्रत्येक ग्राहकाची थर्मल टेस्टींग देखील करण्यात येत आहे.
तब्ब्ल ४५ दिवसानंतर तळीरामांना आज दारू मिळात असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दारू दुकान उघडणार म्हणून तळीरामांनी अक्षरशः सकाळपासूनच दुकानासमोर रांगा लागल्या होत्या.